माजी मंत्री आ. निलंगेकरांनी केला विश्वविक्रमी सृष्टी जगतापचा सत्कार
लातूर/प्रतिनिधीः- सलग 127 तास नृत्य करून गिनीज बुकात स्थान प्राप्त करणार्या विश्वविक्रमी सृष्टी जगतापचा माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला आहे. यावेळी माजी मंत्री आ. निलंगेकरांनी सृष्टीने लातूरचे नाव जागतीक पातळीवर नेऊन लातूरचा गौरव वाढविल्याबद्दल तिचे अभिनंदन करून आगामी काळात तिच्या पाठिशी संपुर्ण भाजप परिवार भक्कमपणे उभा राहिल असा विश्वास दिला.
लातूर येथील सृष्टी जगताप हिने काही दिवसापुर्वी येथील दयानंद सभागृहात सलग 127 तास नृत्य करून जागतीक विक्रम नोंदविलेला आहे. यापुर्वी नेपाळ येथे झालेला विश्वविक्रम मोडीत काढत सृष्टीने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळविलेले आहे. सृष्टीच्या या विश्वविक्रमामुळे लातूर आता जागतीक पातळीवर ओळखले जाऊ लागले आहे. सृष्टी जगतापने केलेल्या या विश्वविक्रमाबद्दल माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी तिच्या लातूर येथील निवासस्थानी जाऊन तिचे अभिनंदन केले आहे. यावेळी आ. निलंगेकर यांनी सृष्टीचा यथोचित सत्कारही केला. सृष्टीने हा विश्वविक्रम नोंदवून लातूरला जागतीक पातळीवर स्थान मिळवून दिल्याबद्दल तिचे विशेष कौतुक करून या विश्वविक्रमासाठी तिने केलेल्या अथक परिश्रमाबद्दलही तिला शाबासकी दिली आहे. तिची हि कामगिरी प्रत्येक लातूरकरांसाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद असल्याचे सांगून तिच्या पाठिशी आपण कायम उभे राहू असा शब्द दिला. या पुढील काळात सृष्टीसह जगताप कुटूंबियांना कोणतीही मदत लागल्यास आपण त्यासाठी तत्पर असणार असल्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर या विश्वविक्रमासाठी तिच्या कुटूंबियांनीही तिची साथ दिली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी केले. यावेळी सृष्टी जगतापने यापुर्वी आपल्या नृत्य अविष्काराने केेलेले विक्रम आणि मिळविलेले पारितोषीके याचीही माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी माहिती घेतली.
यावेळी सृष्टीचे वडील सुधीर जगताप, आई संजीवनी जगताप, आजोबा बबन माने, मावशी रोहिणी माने, मंडल अध्यक्षा तथा माजी नगरसेविका शोभाताई पाटील, निलंगा विधानसभा निवडणूक प्रमुख दगडू सोळूंके,भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे आदींची उपस्थिती होती.