• Thu. Aug 21st, 2025

चालत्या बसचं स्टिअरिंग लॉक, १२ फूट खाली कोसळत दोन वेळा पलटी; भीषण अपघातात…

Byjantaadmin

Jun 14, 2023

सिंधुदुर्ग : आज बुधवारी पहाटे ४.५० ला मालवण आगारातून सुटणारी मालवण – बार्शी या एसटी बसचा कुपेरीची घाटी उताराच्या वळणावर चालत्या बसचा स्टेअरींग लॉक झाल्याने भीषण अपघात झाला. या आपघातावेळी मिळालेल्या माहितीप्रमाणे १८ प्रवासी प्रवास करत होते. ही बस रस्त्याच्या बाजूला १२ फूट खाली कोसळत दोन वेळा पलटी होत एसटी उभी राहिली. सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली असून अपघातात मालवण आगारातील चालक सांगळे हे गंभीर जखमी झाले आणखी ८ जण जखमी झाले आहेत. अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तर वाहक देशमुख आणि इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पहाटे अपघात झाल्याने मार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालक तसेच कुणकावळे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मालवण आगाराचे व्यवस्थापक आणि कर्मचारी चालक यांनीही अपघातस्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेतली.

Sindhudurg Malvan Barshi ST Bus Fatal Accident News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *