• Thu. Aug 21st, 2025

एकनाथ शिंदे आणि 50 आमदार म्हणजे वाघ, त्यांच्यामुळेच तुम्हाला मंत्रिपदं, शिवसेनेने भाजपला सुनावलं

Byjantaadmin

Jun 14, 2023

एकनाथ शिंदे व 50 आमदार हे वाघ आहेत, या वाघांनी उठावं केला तेव्हा कुठे भाजपच्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान मिळालंय..  या मुख्यमंत्र्यांची ताकद आणि वाह वा पाचविण्याची हिम्मत भाजपच्या लोकांनी ठेवायला पाहिजे. त्यांना त्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर 1987 ला भाजपचे फक्त दोनच खासदार होते. आज ते पण हत्ती  झाले आहेत.. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जर असं भाजपचे मंत्री बोलत असतील तर त्यांच्या वरिष्ठांनी लक्ष घातलं पाहिजे. ठाण्याविषयी बोलताना तुम्ही किती होते…? कुणाच्या संगतीने maharashtra  आले ..? याचा सुद्धा भासजपाने विचार करायला पाहिजे.. भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांच्यासारख्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे, अशी प्रतिक्रिया आ संजय गायकवाड शिंदे गट यांनी दिली आहे.. भाजपने आपल्या औकातीत रहावे.. असा इशाराही यावेळी गायकवाड यांनी दिलाय.

eknath shinde Shiv sena mla Sanjay Gaikwad slam bjp and anil bonde latest marathi news udpate एकनाथ शिंदे आणि 50 आमदार म्हणजे वाघ, त्यांच्यामुळेच तुम्हाला मंत्रिपदं, शिवसेनेने भाजपला सुनावलं

अब्दुल सत्तार यांच्याबद्दल काय म्हणाले ?

अब्दुल सत्तार यांनी चांगले काम केले आहे. कालच्या बैठिकीत मी सोबत होतो, तसं काहीही घडलं नाही. अब्दुल सत्तार यांना बदनाम करण्याचं प्रयत्न केला जास्त आहे. अकोला येथील रेड सुद्धा मुख्यमंत्र्यांना विचारून टाकली होती. मुख्यमंत्री व उपमुख्यमंतरी यांनी सत्तार यांना झापलं वगैरे नाही.. अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड  यांनी दिली आहे.

जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो नाही, असं काही लोकांचं म्हणणं आहे, पण बाळासाहेब ज्यांच्या विचारात आहे. ज्यांच्या रक्तात आहे. एखाद्या वेळेस अशी गोष्ट घडू शकते, त्याचा बाऊ करायची गरज नाहीये. पण जो निर्णय जनतेने जाहीर केला की असा मुख्य मंत्री होणे नाही. जर भाजप 135 ते 140 जागा घेईल आणि एकनाथ शिंदे साहेब 90 ते 95 जागेवर लढतील असं जर असेल तर आगामी दीड वर्षात आम्ही मोठी मुसंडी मारू. ती जाहिरात अभिनंदनची होती आणि त्यामुळे अभिनंदन करणारे हे शिवसेनेचे असल्यामुळे सहाजिकच शिवसेनेच्या लोकांचे फोटो त्यात जास्त होते, असे गायकवाड म्हणाले.

लोकसभेच्या राज्यातील 48 जागा भाजप एकटा चिन्हावर लढणार नाही तर भाजप आणि शिवसेनेच्या चिन्हावर लढणार आहे. संजय राऊत याने या सरकारला कितीही नावे ठेवली तरीही ईडीचं सरकार नाही संजय राऊत हा शंभर दिवस जेलमध्ये राहून आल्यामुळे त्याला ईडी सारखी लक्षात राहतेय. पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोग आणि विधानसभेच्या मधात बोलण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही, असे गायकवाड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *