latur शिवसेना वर्धापन दिन व शिवसेना नेते युवासेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण औसा तालुक्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे शिवसेना उपनेते तथा मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर यांच्या सूचनेवरून सदरील आरोग्य चिकित्सा व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 14 जून 2023 रोजी मौजे आशिव तालुका औसा येथून छञपती शिवाजी महाराजांच्या व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली. या समारंभासाठी उद्घाटक म्हणून माजी आमदार दिनकरराव माने व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने उपस्थित होते. तसेच प्रामुख्याने लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या टीमचे डॉ.रवींद्र चव्हाण ,डॉ. शरद चव्हाण ,डॉ. शुभम भोसले हे सर्व डॉक्टर्स उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय समारोप करत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की, शिवसेना वर्धापन दिन व युवा सेना प्रमुख शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण तालुक्यामध्ये या शिबिराचा आयोजन करण्यात आलेल आहे. शिवसेना ही नेहमी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला कानमंत्र 80 टक्के समाजसेवा 20 टक्के राजकारण करत असते. याचाच भाग म्हणून आज औसा तालुक्यामध्ये अशीव या गावापासून आरोग्य शिबिर नेत्र चिकित्सा शिबिराच आयोजन करून सुरुवात करण्यात आलेल आहे. सदरील शिबिर औसा तालुक्यातल्या 105 गावांमध्ये होणार असून प्रत्येक गावात सदरील टीम पोहोचणार आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला नेत्र चिकित्सा करण्यासाठी शहरी भागात जाऊन डॉक्टरची चारशे रुपये फीस देऊन पाचशे रुपयांचा किमान चष्मा जाण्या येण्याचा खर्च दिवसाची मजुरी बुडवून सर्वसामान्य माणसाला किमान हजार ते बाराशे रुपये खर्च येणार आहे. परंतु शिवसेनेने या सर्व बाबी लक्षात घेता ग्रामीण भागातल्या लोकांना फक्त आणि फक्त दोनशे रुपये मध्ये चष्मा देणार आहे या शिबिरामध्ये डोळ्याचा पुढचा जर काही इलाज करायचा असेल शस्त्रक्रिया असेल तर या संपूर्ण रुग्णाची नोंद करून या लोकांच्या शस्त्रक्रियेसाठी शिवसेना नियोजन करणार आहे. तसेच या शिबिरामध्ये सर्वसामान्य माणसाचे जे काही आजार असतील सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी या सर्व तपासण्या होऊन त्याच ठिकाणी औषध उपचार सुद्धा दिला जाणार आहे तरी औसा तालुक्यातील सर्व गावातील तमाम नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक औसा तालुक्याचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांनी केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख औसा विधान सभा श्री. विनोद आण्णा आर्य जिल्हा महिला संघटीका जयश्री ताई उटगे, शिवसेना तालुका प्रमुख श्री. तानाजी सुरवसे, बजरंग दादा जाधव, उप तालुका प्रमुख, आबा पवार, उप तालुका प्रमुख श्रीराम कुलकर्णी, उप तालुका प्रमुख संतोष सुर्यवंशी, मा. जिल्हा परीषद सदस्य राजेंद्र आबा माने, मा. पंचायत समिती सदस्य विनोद भैया माने, मा.जी. प सदस्य राजेंद्र पाटील, गुळखेडा सरपंच भास्कर यादव ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कांबळे गुळखेडा ग्रामपंचायत सदस्य महेश भोसले राजू शिंदे तम्मा रसाळ महादेव साळुंखे, सतिश वाघमोडे,