• Sun. May 4th, 2025

डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्‍याचा उद्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा

Byjantaadmin

Oct 29, 2022

डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्‍याचा उद्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा

 

निलंगा( प्रतिनिधी ):- तालुक्‍यातील अंबुलगा येथे असलेला डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना गेल्‍या १२ वर्षापेक्षा अधिक काळापासून बंद होता. सदर कारखाना सुरू करण्‍यात यावा अशी मागणी सातत्‍याने निलंगा मतदारसंघातील शेतक-यांसह नागरिकांकडुन होत होती. शेतक-यांच हित आणि बेरोजगारांना रोजगार प्राप्‍त व्‍हावा यासह परिसराच्‍या विकासाला चालना मिळावी म्‍हणुन माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुढाकार घेत सदर कारखाना भाडेतत्‍वावर चालू करण्‍यासाठी पुढाकार घेतला होता. या पुढाकारातूनच ओंकार साखर कारखाना प्रा.लि. यांनी कारखाना भाडेतत्‍वावर घेतला आहे. या कारखान्‍याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा आज दि.३० ऑक्‍टोबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्‍या हस्‍ते तर माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास जास्‍तीत जास्‍त शेतक-यांसह नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी केले आहे.

माजी मुख्‍यमंत्री स्‍व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी उभारणी केलेला अंबुलगा येथील डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना निलंगा तालुक्‍यासह मतदारसंघातील शेतक-यांसाठी अतिशय महत्‍वाचा ठरला होता. या कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून शेतक-यांच्‍या जीवनात क्रांती होवून परिसराच्‍या विकासाला चालना मिळालेली होती. मात्र गत १२ वर्षापेक्षा अधिक काळापासून सदर कारखाना बंद अवस्‍थेत होता. गतवर्षी लातूर जिल्‍हयातील ऊस उत्‍पादक शेतक-यांची झालेली अडचण त्‍यामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास मोठया प्रमाणात झालेला होता. शेतक-यांची झालेली गैरसोय लक्षात घेवून माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍याकडे शेतक-यांसह नागरिकांनी डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना चालू करावा अशी मागणी केली होती. या कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून शेतक-यांचे हित आणि परिसराचा विकास त्‍याच बरोबर बेरोजगारांना रोजगार मिळावा या उद्देशाने आ.निलंगेकर यांनी हा कारखाना सुरू करण्‍यासाठी पुढाकार घेतला. विशेष म्‍हणजे जिल्‍हयातील सर्वांत मोठा साखर कारखाना म्‍हणुन या कारखान्‍याची ओळख आहे. या कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून केवळ निलंगा मतदारसंघच नव्‍हे तर जिल्‍हयातील शेतक-यांचा ऊस गाळप करण्‍यास मोठी मदत होणार आहे. त्‍यामुळेच सदर कारखाना सुरू करण्‍यासाठी आ.निलंगेकर यांनी पुढाकार घेवून ओंकार साखर कारखाना प्रा.लि. यांना भाडेतत्‍वावर चालविण्‍यासाठी देण्‍यास मदत केली.

या कारखान्‍याच्‍या मशिनरी दुरूस्‍तीचे काम युध्‍द पातळीवर करून कारखान्‍याचे गाळप लवकरच सुरू व्‍हावे यासाठी चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील आणि त्‍यांच्‍या सहका-यांनी मोठी मेहनत घेतली. परिणामी कारखान्‍याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा आज दि.३० ऑक्‍टोबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्‍या हस्‍ते तर माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास निलंगा मतदारसंघातील शेतक-यांसह नागरिकांनी मोठया संख्‍येने उ‍पस्थित राहावे असे आवाहन चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील व संचालिका सौ.रेखाताई बोत्रे-पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *