विविध मागण्यासाठी औराद शहाजनी येथे मोर्चा
नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली या गावातील अक्षय भालेराव या युवकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काढल्याच्या कारणावरून गावगुंड यांनी मिळून त्याचा खून केला मुंबई येथील विद्यार्थिनी कुमारी हिना ये ग्राम या बौद्ध तरुणीवर बलात्कार करून जीवे मारण्यात आले व रेणापूर येथील मातंग बांधव गिरीधारी तबघाले यांना 3000 रुपये साठी गुंड सावकाराने जीवे मारले या तिन्ही गुन्ह्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बौद्ध व दलित लोकांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यामध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत या गुन्ह्यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून पुन्हा अशा घटना घडू नये तसेच यांच्या प्रमुख मागण्या अक्षय भालेराव हिना येग्राम गिरिधारी तबघाले यांच्या खुनातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या तिन्ही कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी या तिन्ही कुटुंबास शासनाने 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी सदरील प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा सदर हत्याकांडातील उच्चस्त्रीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी सदर गुन्ह्यातील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावा या तीनही कुटुंबास पोलीस संरक्षण देण्यात यावे बेजबाबदार पोलीस फौजदार सरपंच पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांना सह आरोपी करण्यात यावे अशा मागण्या घेऊन औराद शहाजनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून पोलीस ठाणे येथे हा मोर्चा काढण्यात आला व सहाय्यक पोलीस निरीक्षक व तलाठी भोसले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी राहुल मोरे लक्ष्मण कांबळे जीवन कांबळे महेंद्र कांबळे विलास कांबळे पिंटू आर्य अमर मादळे आनंद सागर अतिश कांबळे नितेश कांबळे बंटी पाईकराव सटवाजी कांबळे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते