मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आज राज्यभरातील प्रमुख वर्तमानपत्रांत जाहिरात देत ‘राष्ट्रात नरेंद्र, तर महाराष्ट्रात शिंदे’ असा नवा नारा दिला आहे. याशिवाय एका सर्व्हेचा दाखला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय आहेत, असेही नमूद केले आहे. १०५ आमदार असलेला भारतीय जनता पक्ष शिंदेंचा हा फॉर्म्युला स्वीकारणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा प्रश्न भाजपच्या नेत्यांना विचारला आहे.
राष्ट्रात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे अशी घोषणा, आजच्या जाहीरातीत शिंदेच्या शिवसेनेकडून दिली गेली आहे. यावर बोलताना अजित पवार यांनी भाजपला सवाल केला आहे. पवार म्हणाले,’राष्ट्रात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे’ ही घोषणा भाजपच्या नेत्यांना, भाजप प्रदेशाध्यक्षांना विचारला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता अधिक वाढली, हे भाजपच्या नेत्यांना मान्य आहे का? भाजपच्या लोकांनी याचा खुलासा करावा, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले, राज्यातील काही प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरच आज भाजप आणि शिंदे सरकारच्या सर्वेक्षणाची जाहिरात आली आहे. भाजप -शिंदेंनी सर्वेक्षणाचा करण्याचा विश्वविक्रमच केला. पण हे सर्वेक्षण कुणी केलं, अशी जाहिरात कधी पाहिली नाही. त्यामागंच कारणही समजलं नाही, पण जर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारची एवढी लोकप्रियता असेल तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊन दाखवा, जनतेच्या मैदानात निर्णय होऊ द्या, असे खुले आव्हान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले आहे.
काय आहे जाहीरात?
EKNATH SHINDE यांच्या शिवसेने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहीरातीत एका सर्व्हेचा दाखला देत, भाजपला ३०.२ टक्के तर शिवसेनेला १६.२ टक्के लोकांनी पंसंती दिली आहे, असा दावा केला आहे. तर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांना २६.१ टक्के तर DEVNDRA FADNVIS यांना २३.०२ टक्के लोकांनी पसंती दिली गेली, असाही दावा केला गेला आहे.
या जाहीरातीतFADNVIS यांच्यापेक्षा शिंदेंना मुख्यमंत्रीपदासाठी अधिक पसंती दिल्याचे या जाहीरातीत नमूद केले आहे.तसेच राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे यामुळे शिवसेनेने भाजपवर या जाहीरातीच्या माध्यमातून कुरघोडी केली आहे का? अशी चर्चा होत आहे.