भाजपने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यासाठी उमेदवारांचीही चाचपणी सुरु केली आहे. कुणाला तिकीट मिळणार आणि कुणाचं तिकीट कापलं जाणार, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते eknath khadse यांची सून म्हणून खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचे तिकीट मिळणार की त्यांचे तिकीट कापले जाणार असा सवाल आज पत्रकारांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना विचारला. यावर “ऐनवेळी काहीही होऊ शकते,आजच काही सांगता येणार नाही.” असं सूचक उत्तर दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत प्रश्न विचारला असता girish mahajan म्हणाले की, सुरुवातीपासून रावेर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचाच मतदारसंघ राहि ला आहे.रक्षा खडसेंनी दावा योग्यच आहे.त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक योजना मतदारसंघात राबवल्या, चांगल्या पद्धतीने काम केलं. पण ऐनवेळी काहीही होऊ शकते,आजच काही सांगता येणार नाही.उमेदवारीबाबत भाजपचे निर्णय हे हायकमांड घेत असते. भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डमध्येच निवडणुकीतील उमेदवारांची नावं ठरत असतात. त्यामुळे ऐनवेळी कुणाचं काय होईल हे सांगता येत नाही.हे मागच्या वेळीही तुम्ही पाहिलं आहे. ऐनवेळी कशी तिकीटं बदलतात, हरीभाऊ, स्मिताताई, उमेश पाटील यांचही शेवटच्या दिवशी तिकीट बदललं. त्यामुळे आज हे सांगणं कठीण होईल. भाजपच्या पार्लमेंट बोर्ड हे सक्षम आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय ते घेतं,” असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.
उमेदवारी कुणाला द्यायची आणि किंवा नाही द्यायची हा भाजपच्या हायकमांडचा निर्णय आहे. ऐनवेळी काहीही होऊ शकतं, असं म्हणत रक्षा खडसे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसेंना तिकीट मिळणार की कापलं जाणार,याविषयी चर्चांना आता उधाण आलं आहे.