• Fri. Aug 22nd, 2025

शरद पवारांनी आणखी एक भाकरी फिरवली; खासदार सुनील तटकरेंवर राष्ट्रीय पातळीवरील मोठी जबाबदारी

Byjantaadmin

Jun 13, 2023

खासदार सुनिल तटकरे यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय खजिनदारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय खजिनदार पदासोबत सुनिल तटकरे यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळेआणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्षपदावर नेमल्यानंतर शरद पवार यांनी पक्षात आणखी एक मोठा फेरबदल केला आहे. रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय खजिनदार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय खजिनदार पदासोबत सुनिल तटकरे यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरवण्याचे संकेत शरद पवार देत होते. त्यातच त्यांनी अध्यपदावरून निवृत्तीचा निर्णय घेऊन राजकारणात खळबळ उडवून दिली. आता १० जूनच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी पक्षात दोन कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करत या पदांवर खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांची नियुक्ती केली. त्यासोबतच जितेंद्र आव्हाडांनाही राष्ट्रीय पातळीवर विविध राज्यांचे प्रभारीपद सोपवले. आता खासदार सुनिल तटकरे यांनाही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय खजिनदारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रसिद्धी पत्रक जारी करून ही माहिती देण्यात आली आहे

१० जून रोजी राष्ट्रवादीचा २४ वा वर्धापन दिन राज्यासह देशभरात साजरा करण्यात आला. याचवेळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली. शिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांची राष्ट्रीय खजिनदार पदी नियुक्ती जाहीर केली आहे. तसे नियुक्तीपत्र खासदार सुनिल तटकरे यांना देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *