• Sun. Aug 24th, 2025

मोठा अपघात : ST बस दरीत कोसळली, सुदैवाने झाडांमध्ये अडकल्याने अनेकांचा वाचला जीव

Byjantaadmin

Jun 12, 2023

अमरावती : परतवाडा ते धारणी राज्य महामार्ग १४ यावर आज एसटी बसचा भीषण अपघात झाला. सकाळी १०.४० वाजता एक अमरावती आगाराची अमरावती ते खंडवा जाणारी बस ही एका वळणावर ब्रेक न लागल्याने दरीमध्ये कोसळली. मात्र, दरीत कोसळताना मोठ्या झाडांमुळे अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार चिखलदरा, परतवाडा तसेच सरमसपुरा यांना स्टाफ घेऊन तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.या बसमध्ये एकूण ६४ प्रवासी होते. बस चालक मोहम्मद मुजाहीद हा किरकोळ जखमी झाला. तसेच ६ ते ७ प्रवासी किरकोळ जखमी झाले . सर्व जखमींना तातडीने नजिकचे PHC मधे दाखल करण्यात आले. तर चालक मुजाहीद याला परतवाडा येथे दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यात आले.

st bus fell into valley luckily many lives were saved

बस दरीत कोसळून झाडांमध्ये अडकली

बस उलटल्यानंतर ती रस्त्याच्या खाली असलेल्या दरीत १० ते १५ फुटांवर मोठ्या झाडांना अडकली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताची माहिती एसटी महामंडळाला देण्यात आली. बसचा वाहक बसजवळ हजर राहून त्याने बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये पाठविले, अशी माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *