• Mon. Aug 18th, 2025

MHT CET Result 2023 : एमएचटीसीईटी परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर, ‘ही’ घ्या थेट लिंक

Byjantaadmin

Jun 12, 2023

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल काही वेळेपूर्वी जाहीर करण्यात आला आहे. सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जाता.  त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांच्या असलेल्या तब्बल तीन लाख जागावर प्रवेश दिले जातात. एमएचटी सीईटी परीक्षेसाठी यावर्षी 6 लाख 36 हजार 89 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.आता निकाल जाहीर झाला असून प्रतीक्षा संपली आहे. एमएचटीसीईटी परीक्षेचा निकाल cetcell.mahacet.org  या संकेतस्थळावार विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

असा पाहा MHT CET 2023 रिझल्ट?

  • निकाल पाहण्यासाठी सीईटीच्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या
  • cetcell.mahacet.org  या संकेतस्थळावर  portal links यावर क्लिक करा
  • त्यानंतर Check MHT CET Result 2023  या लिंकवर क्लिक करा
  • रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा
  • रिजल्ट चेक केल्यानंतर त्यांची प्रिंट काढा

एमएचटी सीईटी परीक्षा दोन सत्रांत

राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी सीईटी 9 ते 21 मे या कालावधीत घेण्यात आली. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपची (पीसीएम) परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान घेण्यात आली होती. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपची (पीसीबी) परीक्षा 15  ते 20 मे या कालावधीत पार पडली होती. पीसीएम आणि पीसीबीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या होत्या. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत झाली होती.

प्रवेशासाठी प्रथमच मोबाईल अॅपचा वापर (Mobile App)

प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार असून प्रथमच मोबाईल अॅपमार्फत उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश  प्रक्रियेबाबत विविध टप्प्यांची माहिती तसेच सूचना आणि जागा वाटप आदी माहिती अॅपच्या माध्यमातून उमेदवारांना मिळणार आहे. मोबाईल अॅपचा विद्यार्थी पालक यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे (Admission Process)

प्रवेश प्रक्रिया राबविताना अॅप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. सदर API द्वारे  बारावी गुण, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्र, कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीत लागणारा सात-बारा उतारा.  प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र दाखले यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *