केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नांदेड येथील सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अनेक मुद्यांवर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे सांगत शाह यांनी ठाकरेंनाच टार्गेट केले.शाह म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम आरक्षण, तिहेरी तलाक, राम मंदिर, वीर सावरकर, समान नागरी कायदा यावरून आपली भूमिका स्पष्ट करावी,udhav thakare यांच्यावर टीका करताना त्यांचा भाषणात अनेक वेळा उल्लेख केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे यांच्याविषयी निर्माण झालेली सहानुभूती आणि हिंदू मतांमध्ये होणारे विभाजन गृहीत धरून उद्धव ठाकरे यांना भाजपने टार्गेट केल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आणि १३ खासदारांनी पक्ष सोडला. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजूनही कार्यकर्ते आणि मतदार आहेत. त्यामुळे bjp त्यांना हिंदुत्वाच्या मुद्यावरुन घेरण्याची रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे amit shah .म्हणाले, धर्माच्या आधारे आरक्षण देणे घटनात्मक नाही. त्यामुळे ते मिळणार नाही. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधी भूमिका घेतली तर त्यांच्याविषयी मुस्लिम मतदारांमध्ये निर्माण होत असलेली सहानुभूती कमी होईल आणि जर मुस्लिम मतांच्या कोणत्याही प्रश्नावर ठाकरे यांनी भाजपविरोधी भूमिका घेतली तर त्यांच्यावर भाजपकडून टीका होईल, त्यामुळे सात मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांना भूमिका स्पष्ट करायला शाहांनी सांगितले त्यामागे एक मोठी रणनीती असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंची ताकद कमी झाली असली तरी त्यांना मतदारांमध्ये सहानुभूती मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भाजपने आता ठाकरेंना टार्गेट करण्याची भूमिका घेतली असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदेगट अशी लढत झाली तर भाजपला फटका बसू शकतो, असे अनेक सर्वे सांगतात. त्यामुळेच आता भाजपने आक्रमक रणनीती आखत ठाकरेंची हिंदुत्वाच्या मुद्यावर कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
अमित शाह यांनी भाषणामध्ये congress नेते राहुल गांधी, आणि ncp अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाषणात त्यांचा वारंवार उल्लेख केल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे टार्गेट ठाकरेंच असल्याचे दिसन आले.