• Mon. Aug 18th, 2025

पायलट यांचा बंडाचा इशारा ठरलं कपातलं वादळ; नव्या पक्षाची शक्यता हवेतच विरली !

Byjantaadmin

Jun 11, 2023

काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते तथा आपले वडील राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीनिमित्त दौसा येथे एक मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी त्यांना उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. मात्र यावेळी नव्या पक्षाच्या घोषणेबाबत सुरू असलेल्या शक्यतेबाबत पायलट यांनी कोणतीही घोषणा केली नाही. त्यांनी राजस्थानमध्ये ‘स्वच्छ राजकारण’ करण्याची हाक दिली.

सचिन पायलट म्हणाले, राजस्थानमधील तरुणांच्या चांगल्या भविष्यासाठी मी नेहमी बोलत आलो आहे. येथील जनतेने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. आपला आवाज कमजोर नाही, मी मागे हटणार नाही. देशाला सत्याच्या राजकारणाची गरज आहे. माझे धोरण स्पष्ट आहे, मला ‘स्वच्छ राजकारण’ हवे आहे.दिवंगत राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्थानिक वसतिगृहात त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. यासोबतच अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमापूर्वी पायलटच्या समर्थकांनी राजस्थानच्या निवडणुकीसाठी सहा महिन्यांत नवीन पक्ष सुरू करण्याची शक्यता नाकारली. सचिन पायलटने मात्र या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून आहेत.राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या पुढील राजकीय डावपेचाबाबत सुरू असलेल्या शक्यतांच्या दरम्यान काँग्रेसने शनिवारी या प्रकरणावर सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली होती. राजस्थानमधील राजकीय घडामोडींबाबत विचारले असता काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या की, आमचे पक्षाध्यक्ष  kharge आणि आम्हाला विश्वास आहे की या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघेल.काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी काल म्हंटले होते की, ‘पायलट हे पक्ष सोडून स्वतःचा पक्ष काढतील या सर्व अफवा आहेत. काँग्रेस अध्यक्ष आणि आमचे नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही एकजुटीने निवडणूक लढवू असे सांगितले होते, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *