• Mon. Aug 18th, 2025

आजपासून कर्नाटकमध्ये महिलांना मोफत बस प्रवास, सिद्धरामय्या सरकारची वचनपूर्ती

Byjantaadmin

Jun 11, 2023

आजपासून कर्नाटकमध्ये महिलांसाठी मोफत बससेवा सुरु करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने शक्ती योजना लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. ज्या अंतर्गत महिला आजपासून सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करू शकतील. मिळालेल्या माहितीनुसार, आज कर्नाटक सरकार शक्ती योजना लागू करणार आहे. त्यानंतर आजपासून महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.

कर्नाटक सरकारचा महिलांना दिलासा

कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारने 11 जूनपासून राज्यात नवा नियम लागू केला आहे. या अंतर्गत महिलांना दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महिलांच्या बस प्रवासासाठी विशेष योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना राज्या अंतर्गत 20 किमीपर्यंत प्रवास मोफत असेल. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये महिलांना 50% आहे.

महिलांना 20 किमीपर्यंत मोफत बससेवा

काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी मोफत बस प्रवास, मोफत वीज यासह पाच आश्वासने दिली होती. यानंतर सिद्धरामय्या यांचं सरकार येताच त्यांनी वचनपूर्ती केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केलं होतं की, या योजनेअंतर्गत महिलांना राज्यांतर्गत फक्त 20 किमीपर्यंतच मोफत प्रवास करता येईल. महिलांसह तृतीयपंथीयांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

राज्यातील महिलांना शक्ती योजनेमुळे दिलासा

महागाईने त्रस्त झालेल्या राज्यातील महिलांना शक्ती योजनेमुळे दिलासा मिळणार असल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं. महिलांना आंतरराज्यीय बसने प्रवास करायचा असेल तर ही सेवा मोफत नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. एखाद्या महिलेला तिरुपतीला जायचे असेल तर ती मोफत प्रवास करू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *