राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवर ही धमकी देण्यात आलेली आहे. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संपर्क साधला. “मला व्हॉट्स अॅपवर अशा प्रकारचे मॅसेज आले. अशा धमक्या येणे हे खूप गंभीर आहे. गृहमंत्रालयाने याची दखल घ्यावी. याबाबतचा तक्रार मी आयुक्ताकडे केली आहे. ज्या पद्धतीने या धमक्या आलेल्या आहेत, हे दुर्दैवी आहे. राजकारणात मतभेद जरूर असावेत, पण द्वेषाचं वातावरण इतका पसरवला जात आहे, हे खूपच दुर्दैवी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“अशा द्वेषाचं वातावरण पसरत आहे, धमक्या दिल्या जात आहेत. आज मीmaharshtra आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी करत आहे. police commi. मला शब्द दिलेला आहे की, ते या प्रकरणी लक्ष घालतील. याबाबत ते कार्यवाहीला सुरूवात करतील, मात्र यात काही बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार गृहमंत्री असतील, असे supriya sule म्हणाल्या.