• Mon. Aug 18th, 2025

ठाकरे गटाचे खासदार ओमराजेंच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न; घातपात की अपघात?

Byjantaadmin

Jun 10, 2023

ठाकरे गटाचे फायरब्रॅंड नेते व धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ओमराजे सकाळी ७ वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असतानाच गोवर्धनवाडी येथे घडली. मात्र, या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामेश्वर बंडू कांबळे (रा.अंबाजोगाई, जि. बीड) असं गुन्हा दाखल झालेल्या डम्पर चालकांचं नाव आहे. या घटनेमागे घातपात आहे का याचा तपास पोलिसाकडून सुरु आहे.

Omraje Nimbalkar Breaking News

नेमकं काय घडलं?

खासदार ओमराजे निंबाळकर हे मॉर्निंग वॉकसाठी गोवर्धनवाडी येथील आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरच गेले होते. यावेळी घरी परतत असतानाच भरधाव डम्पर त्यांच्या दिशेने येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी डम्पर चालकाच्या हातात मोबाईल होता. तर तो त्याची डावी बाजू सोडून उजव्या बाजूने येत असल्याने ओमराजे यांनी रस्त्याच्या खाली उडी मारली. तेव्हा डम्पर पुढे निघून गेला.

पाठलाग करुन डम्पर चालकाला पकडलं

खासदार निंबाळकर यांनी या घटनेनंतर पाठीमागून येत असलेल्या मोटरसायकलवर बसून डम्पर (क्रमांक एमएच ४४ के ८८४४)चा पाठलाग करून त्याला रेल्वे गेट परिसरात त्याला पकडलं. डम्पर चालकाला खासदार निंबाळकर आणि गावातील ग्रामस्थांनी जाब विचारला. तसेच त्याला पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. ही घटना चालकाच्या चुकीमुळे झाली? की यामागे काही घातपाताचा हेतू होता का? याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे.

यापूर्वीही हल्ला…

ओमराजे निंबाळकर खासदार झाल्यानंतर आमदार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ २०१९ मध्ये धाराशीव तालुक्यातील पाडोळी येथे गेल्यानंतर खासदार ओमराजे यांच्यावर चाकू हल्ला झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *