मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी आता माजी शालेय शिक्षण मंत्री व काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडने मुंबई काँग्रेसमध्ये अचानक केलेल्या या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर आमदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“याबाबत माझ्याशी पूर्वीच चर्चा करण्यात आली होती. मागील आठवडाभरापासून ही चर्चा असून, सर्व नेत्यांशी सल्लामसलत सुरू असून, नेत्यांशी बोलूनच याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. संजय निरूपम, मिलिंद देवरा इत्यादी मुंबई व राज्यातील नेत्यांशी चर्चा करूनच मुंबई काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आमचे नेते एकनाथ गायकवाड यांच्याशी बोलूनच अध्यक्षपदावर माझी नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई काँग्रेस एका महिलेला संधी देते, याचा मला आदर आणि अभिमान आहे,” असं भाई जगताप म्हणाले.वर्षा गायकवाड यांच कार्य चागलं आहे. यापूर्वी मंत्री म्हणून आणि विशेषत: शिक्षण क्षेत्रात अतिशय चांगलं काम त्यांनी केलं आहे. माझी जेव्हा नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही गायकवाड यांचं नाव चर्चेत होते. त्यामुळे हटवलं आणि ठेवणं हा प्रकार नसतो, असे भाई जगताप म्हणाले.
जगताप यांचं पद का गेलं?
vidhan parishad निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसकडून कारणं शोधण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. याबाबत mohan prakash यांनी काँग्रेस हायकमांडला सादर केलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.handore यांच्या पराभवामुळे काँग्रेसबद्दल अनुसूचित जातींच्या वर्गामध्ये नाराजी होती.