ण विभागाची अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय़एसआयला पुरविल्याच्या आरोपावरून पुण्याच्या डीआरडीओ संस्थेतील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरला याला एटीएसने अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचीही कारवाई करून हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने पत्रकापरिषेदत शुक्रवारी पिंपरीत केली.
कुरुलकरने देशविघातक, दहशतवादी कृत्य करून देशाचा विश्वासघात केला आहे.पण,तो राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा (आरएसएस) प्रचारक असल्याने तपास यंत्रणा त्याला जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे,असा आरोप ब्रिगेडने केला. तसेच या गुन्ह्याचे स्वरूप पाहता त्याच्यावर देशद्रोह आणि दहशतवादी कलमांअंतर्गत कारवाईची गरज आहे. मात्र जाणीवपूर्वक ती करीत नसल्याचा दावा पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष गणेश दहिभाते यांनी केला.येत्या दहा दिवसात ही कारवाई केली नाही,तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करू,असा इशारा त्यांनी दिला. या मागणीचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
संशयित आरोपी कुरुलकरने यापूर्वीच वेगवेगळ्या कार्यक्रमात आपण आरएसएसशी संबंधित असल्याचे स्वतः सांगितले आहे. त्याबाबतही सखोल तपास करून खुलासा होणे आवश्यक आहे. देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तो होणे आवश्यक आहे. परंतू, पुणे एटीएसने जाणीवपूर्वक या गुन्ह्यात नाममात्र कलमे लावल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाल्याचा दावा ब्रिगेडने केला. त्यामुळे त्याला लवकर जामीन होईल. ते देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घातक ठरेल,अशी भीती त्यांनी व्यक्त केली.