निलंग्याचे कौशल्य घेणार अवकाशात झेप!
निलंगा:- येथील विद्यार्थी इमाद अब्दुल मलिक शत्तारी, टीमचे प्रमुख , टीम थ्रस्ट एमआयटी, मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, , न्यू मेक्सिको, अमेरिका येथे होणाऱ्या स्पेसपोर्ट अमेरिका कप या जगातील सर्वात मोठ्या आंतरमहाविद्यालयीन रॉकेट्री स्पर्धेत सहभागी होत आहेत.
थ्रस्ट एमआयटी हा विद्यार्थ्यांद्वारे चालवला जाणारा रॉकेट संघ आहे आणि 2022 पर्यंत या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा हा एकमेव संघ आहे.
रॉकेटची रचना पूर्णपणे निलंगा येथील विद्यार्थी इमाद अब्दुल मलिक शत्तारी या विद्यार्थ्यां व त्यांची टीम ने केली असून त्याला ALTAIR(अलटेर) असे नाव देण्यात आले आहे. हे सुमारे 3 मीटर उंच आहे आणि 3.1 किलोमीटर उंचीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे.
निलंगा येथील विद्यार्थी इमाद अब्दुल मलिक शत्तारी, टीमचे प्रमुख असून आज रॉकेट प्रक्षेपण साठी मेक्सिको अमेरिका येथे जात असून त्यांचा माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सत्कार करून पुढील यश प्राप्ती साठी शुभेच्छा दिल्या.इमाद सतारी हे भाजप अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष इरफान सय्यद यांचे ते भाचे आहेत.