• Fri. Feb 6th, 2026

शरद पवारांना ठार मारण्‍याची धमकी देणारा भाजपा कार्यकर्ता; बावनकुळे, दानवेंसोबतची छायाचित्रे समोर

Byjantaadmin

Jun 9, 2023

वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या तरुणाने ट्विटरवरून पवारांना धमकी दिली. तेव्हापासून सौरभ पिंपळकरचा पोलीस शोध घेत आहेत.

threatened Sharad Pawar

शहरातील साईनगर भागात राहणारा २६ वर्षीय सौरभ हा भाजपाचा कार्यकर्ता आहे. त्‍याच्‍या टि्वटर अकाउंटवर त्‍याने ‘आय ॲम बीजेपी ॲक्टिव्हिस्‍ट, आय हेट सेक्‍यूलेरिझम’ असे लिहून ठेवले आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सौरभ पिंपळकरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गाडगेनगर पोलिसांचे पथक त्‍याच्‍या शोधात आहे. हे पथक त्‍याच्‍या घरीही जाऊन आले, पण तो आढळून आला नाही, त्‍याचा मोबाईलदेखील बंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *