अक्षय भालेराव निर्घृण खुनातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी निलंंगा येथील धरणे आदोंलनातील शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारे सर्व पुरोगामी पक्ष,सामाजीक संघटनांनी केली मांगणी
निलंंगा(प्रतिनिधी);- महाराष्ट्रातील नांदेड जिल्हयातील बोंढार हवेली या गावामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या युवकाचा निर्घुन खुन करण्यात आला.या घटनेचा महाराष्ट्रात तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.निलंगा तालुक्यातील शाहू, फुले,आंबेडकरांच्या विचारावर चालणारे सर्व पुरोगामी पक्ष,विविध सामाजीक संघटना,संस्थेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दि ८जुन रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सदरील घटनेचा तिव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या.अक्षय भालेरावची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी,सदरील खटला हा फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा,सदरचा तपास हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा, अक्षयच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे,अक्षयच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने ५० लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी ,भालेराव कुंटुबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी,
,सदर हत्याकांडाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी,सदर गुन्ह्यातील फरार अरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी,भालेराव कुंटुबास पोलीस संंरक्षण देण्यात यावे,बेजबाबदार पोलिस फौजदार सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांना सहअरोपी करण्यात यावे. तसेच आमच्या वरील मागण्या शासणाने तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा तिव्र आदोंलन छेडण्यात येईल अशा मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी निलंंगा यांचेमार्फत महामहिम राष्ट्रपती ,भारत सरकार,, नवी दिल्ली,राष्ट्रपती भवन यांना देण्यात आले.
यावेळी पंडीतराव धुमाळ,दयानंद चोपने,विलास माने, अड नारायण सोमवंशी,चक्रधरजी शेळके, विलास सुर्यवंशी,रजनिकांत कांबळे, विलास माने,अंकुश ढेरे,धम्मानंद काळे,अमोल सोनकांबळे,हमीद शेख,ईस्माईल लदाफ,मंजुषाताई निंबाळकर, गोविंद सुर्यवंशी,दिंगबर सुर्यवंशी,सुनिल सुर्यवंशी,विजयकुमार सुर्यवंशी,दाजीबा कांबळे,मुजीब सौदागर ,देवदत्त सुर्यवंशी,झटींग अण्णा म्हेत्रे,एस के चेले,अतुल सोनकांबळे, मेघराज जवळीकर, देवदास धैर्य, प्रदीप सोनकांबळे, मुन्ना सुरवसे,रामलिंग पटसाळगे, मारुती गायकवाड, रमेश सोनकांबळे,अंकुश कांबळे, धोंडीराम वाघमारे, अॅड रवी केंद्रे, अजय जगताप, श्रीधर कांबळे गोविंद कांबळे, आकाश सुरवसे, जव्हार पाटील, वामन कांबळे, दत्तू गायकवाड, पवन गायकवाड, सचिन साबळे, आनंदराव साबळे, वंदना सूर्यवंशी, रमा सूर्यवंशी योगेश, सुरज कांबळे, आनंद सुरवसे, नागनाथ घोलप, रोहन सुरवसे,गोंविद कांबळे, विजय ऊस्तुरे, दिनकर शिंदे, आकाश दोरवे, सईद शेख, अजय कांबळे, आदींनी घटनेचा निषेध नोंदवून मनोगत व्यक्त केले. यासह.निलंगा तालुकक्यातील सर्व पुरोगामी पक्ष,विविध सामाजीक संघटना,संस्था यांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते या धरणे आदोंलनात सहभागी झाले होते.
www.jantaexpresss.in