• Mon. Aug 18th, 2025

तुळजापूर मंदिरातील सोने वितळण्याच्या प्रक्रियेस सुरूवात; 200 किलो सोने वितळवणार, महिनाभर वेळ लागणार

Byjantaadmin

Jun 8, 2023

भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीची मोजमाप सुरू झालीय. रोज सकाळी 10 सायंकाळी 6 वेळेत ही मोजमाप केली जाणार आहे. देवीला अर्पण केलेल्या  ऐवजाची 10 वर्षांनंतर प्रथमच मोजणी होतेय. तरीही अंदाजे 200 किलो सोने (Gold), 4 हजार किलो चांदी(Silver) जमा झाल्याचं बोललं जातंय. या सगळ्या ऐवजाची मोजमाप करण्याचासाठी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तुळजापूर मंदिरातील सोने वितळण्याच्या प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. आरबीआयकडून सोने वितळून दिले जाणार आहे.

Maharashtra Tuljapur News Gold melting process starts in Tuljapur temple It will take a month to melt 200 kg of gold Tuljapur News : तुळजापूर मंदिरातील सोने वितळण्याच्या प्रक्रियेस सुरूवात; 200 किलो सोने वितळवणार, महिनाभर वेळ लागणार

आतापर्यंत 105 पाकिटांतल्या सोन्याची मोजदाद

मंदिराच्या दर्शन मंडपातील चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये कडक सुरक्षेत हे काम सुरू करण्यात आलंय. पहिल्या दिवशी एक पेटी मोजणीसाठी आणली गेली. या पेटीत 720 पाकिटे होते.सगळीकडे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.  पहिल्या दिवशी एक पेटी मोजदादसाठी आणली गेली होती.  पेटीत 720 पाकिटे होते. त्यापैकी 105 पाकिटांतल्या सोन्याची मोजदाद करण्यात आली आहे. रोज सकाळी 10 ते सांयकाळी 6 या वेळेत मोजमाप करण्यात येणार आहे.

सोने-चांदीची मोजमाप करण्यासाठी खास वेश

लेखापाल सिध्देश्वर शिंदे यांनी सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक पदाचा चार्ज घेतला. दैनंदिन देवीच्या पुजेसाठी वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या पंचवीस वस्तुंचे हस्तांतरण झाले. दुपारी प्रत्यक्ष एक पेटी आणुन त्यातील सोने मोजदादला आरंभ झाला. सोने मोजदाद प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत करण्यात येत आहे. या सोने मोजदादसाठी शासकीय परवाना धारक मुंबईचे सिध्दीविनायक मंदिराचे सोने मोजदाद करणारे पुरुषोत्तम काळे खास उपस्थितीत होते. ही प्रक्रिया दरम्यान मोजदाद करणाऱ्या मंडळीना खास वेश वापरण्यास दिला होता. या टी शर्ट, पँटला एकही खिसा नाही.

देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लोक येतात

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लोक येतात. दरवर्षी तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक येतात. भक्तगण आपल्या पात्रतेप्रमाणे देवीच्या चरणी दान देतात. सोने, चांदी, रोख रक्कम, दागिने असं दान भक्तांकडून देण्यात येतं.

तिरुपतीच्या धर्तीवर तुळजापुरात हायटेक दर्शन व्यवस्था

तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासाठी प्रशाद योजनेतून एक हजार कोटींचा नवा आराखडा तयार होत आहे. यातून दर्शन अधिक सुलभ करण्यासाठी तसेच भाविकांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठी शिर्डी, तिरूपती देवस्थानच्या धर्तीवर बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांचा वेळ वाचेल आणि गर्दीचंही नियंत्रण होईल. प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजाभवानी मातेच्या शक्तीपीठाला विकासाची प्रतीक्षा आहे. अलीकडच्या काळात मंदिरात वाढलेली गर्दी आणि कमी पडत असलेल्या सुविधांच्या पार्श्वभूमीवर विकास आराखडा राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *