• Thu. May 8th, 2025

लिव्ह-इन पार्टनर महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक केले, पण हत्या केली नाही?

Byjantaadmin

Jun 8, 2023

मीरा भाईंदरमधून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात असणाऱ्या जोडप्यातील ५६ वर्षीय मनोज साने याने पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवले, गॅसवर भाजले आणि नंतर बादलीत लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. हा प्रकार उघड होऊन २४ तासही उलटले नसताना त्यात एक नाट्यमय वळण लागण्याची शक्यता आहे. मृत महिलेने तीन दिवस आधीच विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. या माहितीला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नसला, तरी त्यावरून तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

meera bhayandar murder case (1)

नेमकं काय घडलं?

मीरा भाईंदरच्या गीता नगर परिसरातल्या दीप इमारतीमधून एका आरोपीला पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. मनोज साने असं या ५६ वर्षीय आरोपीचं नाव असून तो सरस्वती वैद्य या ३२ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरसोबत तीन वर्षांपासून इथे राहात होता. मात्र, बुधवारी शेजाऱ्यांना फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता हा सगळा प्रकार उघड झाला.फ्लॅटमध्ये आधी महिलेचे पाय पोलिसांना सापडले. त्यानंतर घरातच एका बादलीत आणि पातेल्यात महिलेचं धड आणि शीराचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवून नंतर लपवून ठेवले होते. काही तुकडे आरोपीनं गॅसवर भाजल्याचंही सांगितलं जात आहे. या सगळ्या प्रकारामुळे खळबळ उडाली असून मनोज सानेनंच मृत महिलेची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.

हत्या की आत्महत्या?

दरम्यान, या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. सरस्वती वैद्यची आरोपीनं हत्या केली नसून तिनं तीन दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली होती अशी चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज सानेला सरस्वतीच्या चारित्र्यावर संशय होता. या कारणावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचा. अशाच एका वादानंतर तीन दिवसांपूर्वी सरस्वतीने विष पिऊन घरातच आपले जीवन संपवले होते.यामुळे तिच्या मृत्यूस आपण कारणीभूत ठरणार असल्याची भीती मनोज याला वाटू लागली होती.सरस्वतीच्या मृत शरीराची परस्पर विल्हेवाट लावण्यास त्याने सुरुवात केली.यात त्याने कटरच्या वापराने तिच्या शरीराचे तुकडे करून ते कुकर मध्ये शिजवले. त्यानंतर भाजून ते मिक्सरच्या मदतीने बारीक केले.तो राहत असलेल्या सोसायटीच्या मागील गटारात त्याने हे तुकडे फेकल्याची माहिती मिळत आहे. यासाठी त्याने वापरलेले साहित्य आणि बाईक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, अशीही माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *