• Tue. May 6th, 2025

निलंगा तालुक्यात अवैध वाळू विक्री करणाऱ्या वाहनावर उपजिल्हाधिका-याची धडक कारवाई

Byjantaadmin

Jun 7, 2023

अवैध वाळू विक्री करणाऱ्या वाहनावर उपजिल्हाधिका-याची धडक कारवाई

कोकळगाव,औराद येथील तीन ट्रॕक्टर मालकावर गुन्हा दाखल

निलंगा/प्रतिनिधी

कोकळगाव व औराद शाहजानी येथील अवैध वाळू विक्री करणाऱ्या तीन ट्रॕक्टर मालकावर निलंग्याच्या उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यानी दंडात्मक कारवाई करून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील तेरणा नदी पाञातील विनापरवाना अवैध वाळू उपसा करणाऱ्या औराद येथील जावेद सरफोदिन मुल्ला राहणार वांजरखेडा भागवत लक्ष्मण जाधव रा. मानेजवळगा यांचे ट्रॕक्टर क्रमांक एमएच २०सीआर २९३५ मध्ये शासनाच्या मालकीची वाळू उपसा करून संगनमताने वरील दोघेजन अवैध रित्या घेऊन जाऊन विक्री करत असल्याचे महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना अढळून आले असता दिनांक ६ रोजी १.२४ वाजता औराद शाहजानी येथील कर्नाटक सीमा भागातील टोल नाक्याजवळ पकडून त्यांचा ३ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.तसेच सदरील वाळू माफीयावर औराद शाहजानी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.व त्यांच्यावर शासकीय नियमाप्रमाणे १ लाख २० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.तसेच निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील दोन ट्रॕक्टर मालक व चालक शासनाची तेरणा नदी पाञातील अवैध वाळू उपसा करून टूरॕक्टरमध्ये भरून घेऊन विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना कोकळगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील बाजूस एका शेतकऱ्याच्या शेतात राञी १ वाजता निलंग्याचे उपजिल्हाधिकारी शोभा जाधव व मंडळ अधिकारी तलाठी यानी अचानक धाड टाकून वाळूने भरलेले ट्रॕक्टर पकडले असता ट्रॕक्टर मालक चालक वाळूने भरलेले वाहने सोडून पळून गेले आहेत.सदरील अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन्ही वाहनावर नंबर नाहीत.कोकळगाव येथील अज्ञात मालक व चालक यांच्यावर कासार शिरसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ७ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,नंबर नसलेल्या दोन्ही टूरॕक्टरच्या अज्ञात मालक व चालकावर २ लाख ४० हजाराचा दंड ठोठावण्यात आला असून एकून १० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास औराद शाहजानी व कासार शिरसी पोलिस ठाण्याचे पोलिस करत आहेत.

या अवैध चोरून वाळू विक्री करणाऱ्या धडक कारवाई मध्ये तलाठी मुकेश चंद्रकांत सागावे,मधूकर रोहिदास सुर्यवंशी,गंगाराम सुर्यवंशी पोलिस भोसले हे कर्मचारी या कारवाईत सोबत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *