हासोरी बु. व हासोरी खु. येथे भूकंपाच्या अनुषंगाने तात्पुरते निवारे उभारण्यासाठी ३ कोटींचा निधी मंजूर आमदार अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा
निलंगा / प्रतिनिधी- २०२२ च्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांमध्ये औसा विधानसभा मतदारसंघातील हासोरी बु. व हासोरी खु. ( ता. निलंगा) या गावांमध्ये जाणवत असलेल्या सततच्या भूकंपाच्या सौम्य धक्यांमुळे या दोन्ही गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव तसेच तत्कालीन प्रधान सचिव यांच्याकडे ही पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे हासोरी बु. व हासोरी खु. येथे भूकंपाच्या अनुषंगाने तात्पुरते निवारे (टेंट) उभारण्यासाठी ३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात याव्यात अशी विनंती त्यांना केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन प्रधान सचिव यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. या सर्व पाठपुराव्याला यश आले असून हासोरी बु. येथे ४२० तर हासोरी खु. येथे २५८ असे एकूण ६७८ वैयक्तिक तात्पुरते निवारे (उच्च प्रतीचे टेंट) उपलब्ध करून देण्यासाठी ३ कोटी ५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नागरिकांना संकटाच्या काळी या टेन्ट्सचा उपयोग तात्पुरत्या सुरक्षित निवाऱ्यासाठी करता येणार आहे. आमदार अभिमन्यू औसा विधानसभा मतदारसंघातील हासोरी बु. ब हासोरी खु. या गावांमध्ये २०२२ च्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांमध्ये सततच्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे या दोन्ही गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी या गावांचा दौरा करून येथील लोकांशी संवाद साधत याबाबत आवश्यक शासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १४ ऑक्टोबर रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता यांची भेट घेऊन
आमदार पवार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सदरील गावांमध्ये भूकंपाच्या अनुषंगाने तात्पुरते निवारे उभारण्यासाठी ३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत हासोरी बु. व हासोरी खु. ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार अभिमन्यू पवार यांचे आभार मानले आहेत.