राज्यात आणि देशात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. पण कारण नसताना लव्ह जिहादसारख्या नाही त्या प्रश्नांना फाजील प्रश्नांना महत्त्व दिलं जातं आहे.समाजा-समाजात तेढ वाढवली जात आहे. या सगळ्या गोष्टींना मीडियानेही फार प्रसिद्धी देऊ नये.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष sharad pawar यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील दंगली, हिंसाचार आणि लव्ह जिहाद सारख्या घटनांवर त्यांनी भाष्य केलं. देशात आणि राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना नाही त्या प्रश्नांना फाजील प्रश्नांना महत्त्व दिलं जातं आहे. केरळमध्ये चर्चेसवर हल्ले झाले. ख्रिश्चन समुदाय हा शांत स्वभावाचा असतो.समजा जर एखाद्याची चूक झाली असेल तर चर्चवर हल्ला करण्याचं कारण काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या सर्व हल्ल्यांमागे एक विशिष्ट विचारधाराही दिसून येते. ती विचारधारा देशहिताची नाही. आदिवासी आणि दलित समाजांना जपणं हेही राज्य आणि केंद्र सरकारचं काम आहे, असंही शरद पवार म्हणाले.
शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणे, ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण राज्यकर्ते आणि त्यांचे सहकारीच जर रस्त्यावर येऊ लागले तर, दोन गटात कटुता निर्माण होत असेल तर समाजासाठी ही काही चांगली गोष्ट नाही, असही पवार म्हणाले. तसेच, पायाभूत सुविधा, पाणी, रस्ते, वीज, आरोग्य शैक्षणिक सुविधा या गोष्टींकडे राज्यकर्त्यांचं लक्ष अधिक असायला हवे, असेही शरद पवार म्हणाले
यावेळी पवार यांना धार्मिक अल्पसंख्यांक यांच्यावरील हल्ले, चर्चवरील हल्ले याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर पवार म्हणाले, ‘ओडीशामध्ये आणि काही राज्यामध्ये चर्चवर हल्ले झाले. खिश्चन समाज तसा शांतताप्रिय असतो. कुणाची काही चूक असेल तर पोलीस अॅक्शन घ्यावी. त्यासाठी धार्मिक स्थळांवर कशाला हल्ला करावा? हे जे घडतंय, हे सहजासहजी घडत नाही. हे एकटया दुकट्याचं काम नाही. यामागे काही विचारधारा आहेत. ती विचारधारा समाजाच्या हिताची नाही, असे शरद पवार म्हणाले.