महाराष्ट्रातील नऊ उड्डाणपुलाचे लोकार्पण सोहोळा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर कार्यक्रम पार पडला. तसेच नितीन गडकरी हे कार्यक्रमास ऑनलाईन सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य असा मंडप उभारण्यात आला होता. एक हजार नागरिकांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. पण साडेतीन वाजण्याच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील नागरिकांनी कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. यामुळे आयोजकांनी प्रशिक्षणार्थ महिला पोलिस कर्मचाऱ्याना कार्यक्रमांच्या ठिकाणी बोलविण्याची वेळ आली.
दरम्यान मुख्यमंत्री EKNATH SHIND Eहे पाच वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी आले.त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीमधून उतरताच पालकमंत्री CHANDRAKANT PATIL हे कार्यक्रमाबाबत माहिती सांगत होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ऑनलाईन कार्यक्रम घेतला असता तर बरं झालं असतं. असं चंद्रकांत पाटील यांना सांगितले.
या कार्यक्रमाला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सभागृहातील मागील बाजूची आसने रिकामी आहेत. त्यामुळे खुर्च्या उचलून ठेवण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने (महारेल) राज्यातील विविध ठिकाणच्या नऊ उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि ११ पुलांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या उड्डाणपुलांमुळे सातारा हिंगोली येथील रेल्वे वाहतूक विनाअडथळा सुलभ होणार आहे.रेल्वे फाटकावर अपघात कमी व्हावेत, वाहतूक कोंडी होऊ नये, सुलभ आणि विनाअडथळा प्रवास व्हावा, याकरिता राज्याच्या विविध भागांत उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यापैकी नऊ उड्डाणपुलांचे लोकार्पण, तर ११ उड्डाणपुलांचे भूमिपूजन होणार आहे. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय मैदान येथे हा कार्यक्रम होत आहे. केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृश्य प्रणलीद्वारे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.पाटण, अतिग्रे, रहिमतपूर, अंमळनेर, शिंदखेडा, हिंगोली, उमरखेड, डोंगरगाव आणि बुटीबोरी येथील उड्डाणपुलांचे लोकार्पण होणार आहे, पालघर, ठाणे, नगर, सातारा, सांगली, सोलापुरातील दोन, धाराशिव, लातूर, जळगाव आणि बुलढाणा येथील उड्डाणपुलांचे भूमिपूजन या वेळी करण्यात येणार आहे.दरम्यान, महारेलमार्फत राज्यात येत्या वर्षभरात १०० रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार असून पुढील पाच वर्षांत राज्यातील रेल्वेचा प्रवास फाटकमुक्त करण्याचे प्रस्तावित आहे. महारेलकडून राज्यात विकासकामे करण्यासाठी केंद्र सरकारने १३ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे. या माध्यमातून ही कामे करण्यात येत आहेत.