काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील तीन शहरांमध्ये राहुल गांधी संबोधित करत आहेत. न्यूयॉर्कमधील जेविट्स सेंटर येथे राहुल गांधी नागरिकांशी चर्चा करणार आहे. त्यापूर्वी न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा व्हिडीओ झळकला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सहा दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी सॅन फ्रॉन्सिस्को आणि वॉश्गिंटन डीसी येथे संबोधित केलं आहे. तेव्हा प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य, अर्थव्यवस्था, बेरोजगारी, नवीन संसद भवन या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केलं.
रविवारी ( ४ जून ) राहुल गांधीं न्यूयॉर्कमधील जेविट्स सेंटर येथे संबोधित करणार आहेत. त्याआधी न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा व्हिडीओ झळकला आहे. याचा व्हिडीओ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून समाजमाध्यमांवर व्हायरल केला जात आहे. तसेच, जेविट्स सेंटर येथील कार्यक्रम पार पाडण्यासाठी तेलंगणा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी, खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा, प्रवक्त्या अलका लांबा आणि अन्य काँग्रेस नेते न्यूयॉर्कला पोहचले आहेत.
Visuals on Billboards in New York down town on the eve of @RahulGandhi 's Visit. pic.twitter.com/yQwnkAbauP
— Tamil Nadu Congress Committee (@INCTamilNadu) June 4, 2023