भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आज (शनिवारी) गोपीनाथ गड येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री धनंजय मुंडे, रोहिणी खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी सुमारे अर्धातास बंद दाराआड चर्चा झाली.पंकजा मुंडे यांनी दिल्लीत तीन दिवसापूर्वी केलेल्या विधानामुळे त्या पुन्हा नाराज असल्याची चर्चा आहे. या चर्चांवर आज पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
आजच्या कार्यक्रमात काय बोलणार असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता त्या म्हणाल्या, “आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक दिवस आहे. हा दिवशी माझ्यासाठी राजकारण शून्य आहे. याठिकाणी जे लोक आले आहेत, त्यांना मी काही दिले नाही. मी यावेळी कोणत्याही राजकारण्यांना निमंत्रित केलेले नाही. कोणत्याही मोठ्या नेत्यांला बोलावले नाही. मी फक्त भजन कीर्तन आणि मुंडेवर निष्पाप प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम ठेवला आहे,””माझ्याकडे कधी कागद नसतो, कधी चिट्टी नसते. GOPINATH MUNDE यांचे वादळी जीवन होत आणि मी वादळाची लेक आहे. माझ्या भाषणानंतर येणाऱ्या वादळाची मी दिशा बदलली आहे,” अशा शब्दात त्यांनी या विषयावर बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला. ‘मी जे काही बोलेल ते आज तीन वाजता बोलेल,’ असंही पकंजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
“एखादी व्यक्ती जेव्हा एखादं वक्तव्य करतो तेव्हा तो व्यक्ती पत्रकार परिषद घेऊन बोलतो. पण जर एखादा व्यक्ती समोरच्या व्यक्तींसमोर एका भाषणात बोलत असतो, त्या भाषणाचं पोस्टमार्टम करण्याला बातमी म्हणत नाही. मी आज दुपारी 3 वाजता बोलणार आहे. त्याचं तुम्ही पोस्टमार्टम करणार, याची मला सवय झाली आहे. पण ते तुमचं प्रेम समजून मी स्विकारते,” असे मुंडे म्हणाल्या.
वादळाची दिशा खडसेंनी बदलली का..
खडसे-मुंडे या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं होतं. या भेटीनंतरPANKAJA MUNDE यांनी प्रतिक्रिया देताना मोठा गौप्यस्फोट केला. “मी वादळाची लेक आहे. वादळ येणार होते, मात्र त्याची दिशा बदलली,” असे त्या म्हणाल्या. त्यामुळे EKNATH KHADSE नी त्यांना काय सल्ला दिला हे मात्र गुलदस्त्यातच आहे. वादळाची दिशा खडसेंनी बदलली का असा प्रश्न विचारण्यात येत आहे.