राणे साहेब, “ना निवडणूक… ना झंजट, सोडतीत लागले… रेडिमेड केंद्रीय मंत्रीपद”
आपले प्रधान सेवक (मंत्री) भारतभर सर्व राज्ये पिंजून काढतात, त्यांचे परदेशातील दौरे नेहमीच यशस्वी तथा चर्चेत राहिल्याचे आपण पाहतोच आहे.
पण त्यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, हे कोणत्या खात्याचे मंत्री आहेत , हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या स्मरणात नाही. त्यांचे खात्याकडून आपल्या राज्यात तर कुठलाही प्रकल्प म्हणा ,या कोणत्या कामाचे उद्घाटन झाल्याचे ऐकवत, वाचण्यात नाही.
भारत देशात तर कोठे काही भरगच्च असा त्यांचा कार्यक्रम झाल्याचे कोणासही आठवनार नाही; अधून-मधून आपल्याच राज्यात नेहमी लुडबुड करीत असतात . यात नोंद घेण्यासारखे कोणतेही त्यांच्या हातून घडलेले नाही
‘ महाराष्ट्र दौरा नेहमीच गाजतो’ तो फक्त एका कारणामुळे ते म्हणजे ठाकरे कुटुंबीयावर बेछूट आरोप, टीका ते शिवराळ भाषेत.
जेथून मोठे झाले, ते पूर्णपणे विसरले. कोण होते ? काय झाले ?त्यांचा संपूर्ण इतिहास, जनता जनार्दन जाणते आहे . देशाच्या जनतेसाठी कोणता फायदेमंद असा ठोस कार्यक्रम यांच्या हातून घडला ,देव जाणे…
केंद्रीय मंत्री पदाला शोभेल ,साजेल असे कोणते कार्य त्यांचा हातून घडले हा एक स्वतंत्र तपासाचा गूढ विषय समजावा लागेल. यांना केंद्रात मंत्री पद कसे व का दिले ? हेच त्यांनी आजपर्यंत सिद्ध केलेले नाही.
कोणते कार्य देशासाठी, राज्यासाठी, जनसुविधेस अनुसरून केले ,हे महत्त्वाचे असताना, नको ते अस्विकारहार्य टीका, टिप्पणीत नेहमी गर्क….
त्यांच्या टीका टिपण्याचा खरोखरच उबग आलेला आहे .आता नको ती बयानबाजी…
देशातील इतर केंद्रीय मंत्री महोदयांचे खाते, त्यांचे कार्य, त्यांचे प्रसिद्धी आपण पाहतोयच, परंतु केंद्रात मिनिस्टर असलेले नारायण राणे, हे फक्त ‘मिस्टरच’ आहेत, हे त्यांनी स्वतः च सिद्ध केलेले आहे .
मा. प्रधानमंत्री महोदयांनी ,त्यांच्या खात्याच्या कारभाराविषयी जर ‘ऑडिट लेखाजोगा’ प्रगती तपासणी झाली, तर त्यांना गच्छन्ती भोगावी लागणार, यात शंका नसावी.
शिवाय भाजपाचा कार्यक्रम, तथा प्रधानमंत्री महोदयांनी केलेल्या कामाची ही, कोठे सभेतून त्यांनी उच्चार तथा प्रचार वगैरे केलेले दिसत नाही.
शिवाय, त्यांचे नशीबी आलेल्या खात्याचा मात्र सन्मान, गौरव तथा त्यांच्या नियुक्ती नंतरचा लोकहिता बाबतचा गाजावाजा किंवा प्रसिद्धी ही कोणी वाचली,पाहिली, ऐकली नाही.
ते फक्त महाराष्ट्रात अधून मधून दौरे काढतात. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत की नाही , त्यांच्याही लक्षातून गेले की काय? असा प्रश्न जनतेस आहे.
जनतेने, सदर मंत्र्यास देशासाठी-राज्यासाठी कोणत्या-कुठल्या जनहितासाठी कार्यक्रम राबवला ? याचा जाब विचारला पाहिजे . यांचा कुठलाच गाजावाजा व यशस्वी कार्यक्रम, प्रोजेक्ट सिद्ध झाला नाही.
सदर मंत्र्यास, विनसायास -बिन कष्टात राज्यसभेची खासदारकी व केंद्रीय मंत्री पदाची ‘लॉटरी’ सोडत लागली , असेच म्हणावे लागेल.
ना निवडणूक, ना झंजट, रेडीमेड मंत्रीपद ..
या पदास शोभेल, नावलौकिक होईल ; असे जनहित साधणारा कोणत्याच राज्यात प्रकल्प नाही. यशस्वी दौरा वगैरे.. गाजलेला काही स्मरणात राहील, अशी कोणतीही जमेचे बाजू नसलेले , फक्त ठाकरे कुटुंबावर टीकाकार मंत्री…
त्यांच्या खात्या शिवाय नारायण राणे यांना अतिरिक्त स्वतंत्र पदभार म्हणून “टीकाकार खात्याचे मंत्री” म्हणून नियुक्ती केली असेल, असेच भविष्यात जनता संबोधेल ..
केंद्रात मंत्री पद अनायासे प्राप्त झाले, त्या खात्यामार्फत होईल असे कार्य करून संधीचे सोने केले पाहिजे , ते सोडून फक्त ठाकरे कुटुंबावर टीका, शिंतोडे एकमेव एकच कार्यक्रम राबवतात.
त्यांच्या मंत्रिपदामुळे भाजपचे वरिष्ठ नेते उदाहरणार्थ श्री नितीन गडकरी , श्री देवेंद्र फडणवीस, हे टीका टिप्पणी करतात; पण सावध मर्यादित असतात.
शिवाय मोदीजी हे कोणावर एकेरी, शिवराळ अशी अजिबात भाषा वापरल्याचे उदाहरण नाही.
पर्यायाने नारायण यांच्या असभ्य टिकेमुळे माननीय प्रधानमंत्री महोदय , तथा भाजपाची प्रतिमा मलिन होईल असे वाटते.
त्यांचे बरेच पी. ए. तसेच वाहन स्टॉप, कार्यालय, दौरे, भत्ता, मानधन बिनकामाचा, भारत सरकार पर्यायाने जनतेच्या पैशाचा सरकार खजिन्याला भुर्दंड म्हणता येईल. *पांढरा हत्ती पोसणे, भारत सरकारच्या खजिन्याला परवडणारे नाहीच*…
यांना ठाकरे कुटुंबावर फक्त टीका करण्यासाठी , स्पेशल खात्याची मिनिस्ट्री निर्मिती केली गेली काय? असे वाटून जाते.
आम्ही भाषेचे संतुलन संस्काराने सांभाळणारे आहोत. अभद्र,शिवराळ, अप्रिय लिहिणे-बोलणे शोभत नाही; परंतु जे सिद्धीस पात्र आहेत- नाहीत माहित नाही; तेही मोठ्या हुद्द्यावरून आपले पात्रता लायकी प्रसिद्ध करण्यात कोणी यशस्वी तर कोणी अपयशी त्यापैकी आपण कोठे आहात हे शोधा? पदाला शोभेल असे कार्य सर्वांना अपेक्षित असताना फक्त एकमेव ठाकरे घराण्यावर सतत टीका हे आता बंद करा आणि कार्य करून दाखवा.
आपल्या मंत्री पदावर भारत सरकार वारेमाप खर्च करते ते टीका करण्यासाठी मुळीच नाही, वेळ गेली नाही; वेळेत सुधरा. जनता आपणास ओळखून आहे.
श्री. लिंबन वि. रेशमे, शिवसैनिक, तथा मा.जि.नि.स. लातूर जिल्हा. संपर्क: 9422470046