हाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल (SSC Result 2023) आज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल (Maharashtra Board HSC Result 2023) 93.83 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे.
दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा दहावीचा एकूण निकाल 93.83 टक्के लागला आहे. तर राज्यातील 43 शाळांचा निकाल 0 टक्के लागला आहे. तर राज्यातील 29.74 टक्के शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. याशिवाय राज्यातील 151 विद्यार्थ्यांना 100 टक्के मार्क मिळाले आहेत.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (Mumbai Division) लागला आहे. याशिवाय यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 3.82 टक्क्यांनी अधिक लागला आहे. यावर्षी 95.87 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 92.05 टक्के आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच, विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड करून प्रिंटही काढू शकणार आहेत. त्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला भेट द्या.
100 टक्के विभागनिहाय शाळा 29.74 टक्के
पुणे विभाग : 1240 टक्के
नागपूर विभाग : 709 टक्के
औरंगाबाद विभाग : 644 टक्के
मुंबई विभाग : 979 टक्के
कोल्हापूर विभाग : 1089 टक्के
अमरावती विभाग : 652 टक्के
लातूर विभाग : 383 टक्के
कोकण विभाग : 427 टक्के
राज्यात 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151
100 टक्के मार्क मिळवले विभागीय विद्यार्थी संख्या :
PUNE : 5
औरंगाबाद : 22
मुंबई : 6
अमरावती : 7
लातूर : 108
कोकण : 3
यंदा दहावीचा निकाल 93.83 टक्के
मार्च 2020 : 95.30 टक्के निकाल
मार्च 2021 : 99.95 टक्के निकाल
मार्च 2022 : 96.94 टक्के निकाल
मार्च 2023 : 93.83 टक्के निकाल
पुनरपरिक्षार्थींचं उत्तीर्णतेचं प्रमाण : 60.90 टक्के
खाजगी विद्यार्थ्यांचं उत्तीर्णतेचं प्रमाण : 74.25 टक्के
दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचं प्रमाण : 92.49 टक्के