• Tue. Apr 29th, 2025

भारताच्या विकासाला नरेंद्र मोदी यांनी नवी दिशा दिली- खा.सुधाकर शृंगारे

Byjantaadmin

Jun 1, 2023

भारताच्या विकासाला नरेंद्र मोदी यांनी नवी दिशा दिली- खा.सुधाकर शृंगारे

जिल्ह्यात भाजपाचे जनसंपर्क अभियान

लातुर:-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी गेल्या 9 वर्षात गोरगरिब सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून विविध विकासाच्या योजना यशस्वी रित्या राबवील्या. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. राम मंदीर, कलम 370, तीन तलाक यांसह अनेक प्रश्न सहजतेने सोडवले. सुधारणाचे नवे पर्व सुरु केले. भारताला आर्थिक दृष्ट्या संपुर्ण जगात सर्वश्रेष्ठ बनवीण्यासाठी अर्थकारणात अमुलाग्र बदल केले. नव्या परराष्ट्र धोरणामुळे भारताचा साऱ्या विश्वात सन्मान वाढवीला. भारताला सर्वोत्तम बनविण्याचे स्वप्न ते सत्यात उतरवत आहेत, असे प्रतिपादन लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.सुधाकर शृंगारे यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना केले.
जगातील लोकप्रिय नेते, देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 9 वर्ष नुकतेच पुर्ण केले. त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात महाजनसंपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान लातूर लोकसभा मतदार संघातही प्रभाविपणे राबवीले जाणार असून या अनुषंगाने माहिती देण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुधाकर शृंगारे हे बोलत होते. याप्रसंगी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, औसा विधानसभेचे आ.अभिमन्यु पवार, लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे आणि दिग्वीजय काथवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खा.सुधाकर शृंगारे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात विकासाची जी कामे होऊ शकली नाहीत ती सर्व कामे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अवघ्या 9 वर्षात करुन दाखवीली. देशहिताबरोबरच देशातील गोरगरीब सर्वसामान्य माणसांना शेतकरी शेतमजुरांना दिलासा देण्याचा आणि त्यांची आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला. काश्मिर पासुन कन्याकुमारी पर्यंत संपुर्ण देशाला विकासाच्या वेगळ्या दिशेने घेऊन जात सर्वांगीन प्रगती साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी बोलून दाखवीले.
9 वर्षात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या विविध विकासकामांची माहिती देताता खा.सुधाकर शृंगारे म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन सुरक्षा व्यवस्था मजबुत केली. काश्मिरचे 370 कलम रद्द करून ऐतिहासीक निर्णय घेतला. 500 वर्षापासून प्रलंबित असलेलया अयोध्येतील राम मंदीराचा प्रश्न निकाली काढला, जगातील सर्वात सर्वात उंच सरदार वल्लभभाई यांचा पुतळा, देशातील दुर्गम भागात दळणवळणाची मोठी सोय. आत्मनिर्भर भारत आणि डिजीटल क्रांती अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात थेट लाभ दिला, आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गंत छोट्या व्यवसायिकांना प्रोत्साहन दिले. युवा शक्तीस नव्या शिक्षणाच सुविधा, रोजगाराच्या संधी तसेचा खेळाच्या नव्या युगाची सुरुवात केली. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक योजना राबवील्या. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा प्रदान केल्या, 3.5 कोटी पेक्षा अधिक बेघर परिवारांना पक्क घरे दिली, 220 कोटी कोरोना प्रतिबंधक जगात सर्वाधिक मोठे लसीकरणाचे अभियान राबवीले, जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल, नल से शुद्ध जल अंतर्गत 12 कोटी घरात नळाद्वारे शुद्ध पाणी दिले. शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी अंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपयाची मदत याप्रमाणे गेल्या 4 वर्षात 11 करोड शेतकऱ्यांना 2.5 लक्ष कोटी रुपयांचा निधी वाटप केला.
उच्च शिक्षणात आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण लागू केले, मागास्वर्गीय आयोगाला संविधानीक दर्जा देऊन सामाजीक सक्षमीकरण केले. दिव्यांगाना सन्मान आणि समान हक्क दिला. अवघ्या 9 वर्षात 74 नवीन विमानतळाची उभारणी करुन व्यापार उद्योगास चालना दिली, 54 हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची रेकॉर्ड ब्रेक बांधणी केली, शंभराहुन अधिक जलमार्ग सुरु केले, जागतीक दर्जाच्या आधुनिक नवीन 20 वंदे भारत रेल्वे सुरु केल्या अशी माहिती देऊन लातूर लोकसभा मतदारसंघात मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या केंद्र सरकारने मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याची लातूरात उभारणी केली, ग्रामीण भागातील 18,929 महिला बचत गटांना 38420 लक्ष रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले अद्यावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण झाले अशी माहिती खा. शृंगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना खा सुधाकर शृंगारे आ रमेशआप्पा कराड आणि आ अभिमन्यू पवार यांनी समर्पक दिलखुलासपणे उत्तरे दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed