बालाजी काळगे यांची पोलिस उपनिरिक्षकपदी पदोन्नती
निलंगा (प्रतिनिधी) मुळचे बसपूर ता. निलंगा येथील रहीवाशी व गांधी चौक पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक म्हणून कार्यरत असलेले बालाजी बळीराम काळगे यांची पोलिस उपनिरिक्षकपदी नुकतीच पदोन्नती झाली आहे.
बालाजी काळगे हे १९८८ या वर्षी पोलिस दलामध्ये भर्ती झाले होते. त्यांची आजपर्यंत ३५ वर्षे सेवा झाली असून त्यांचे पदविकापर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. आजपर्यंतच्या चांगल्या कामगीरी बद्दल २७७ बक्षिस मिळाले आहेत. सेवेच्या काळात चाकूर, लातूर ग्रामीण, पोलिस अधिक्षक कार्यालय, उदगीर यासह आदी पोलिस ठाण्याला सेवा केली असून एक मुलगी व जावाई डाॕक्टर आहेत तर एक मुलगा पोलिस खात्यात व दुसरा इंजिनियर आहे. नुकतीच त्यांना पोलिस उपनिरिक्षकपदी पदोन्नती मिळाली असून त्यांची नियुक्ती स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथे झाली आहे. या पदोन्नतीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.