• Tue. Apr 29th, 2025

मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष माझा थोडीच आहे; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Byjantaadmin

Jun 1, 2023

राष्ट्रीय समाज पक्षाने बुधवारी (31 मे) दिल्लीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली. दरम्यान याच कार्यक्रमाच्या भाषणामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ‘मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष थोडीच माझा आहे’, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या याच वक्तव्याचे आता वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढले जात असून, यावर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे.

कुस्तीपटूंचं दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनावरून भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे (BJP MP Pritam Munde) यांनी स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर दिला असतानाच, आता पंकजा मुंडेंच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्लीत आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, “मी भाजपची आहे, पण भाजप ही पार्टी माझी थोडीच आहे. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तर त्यांच्या याच वक्तव्यावरून आता चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर एकदा अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांची देखील पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिकिया आली आहे. “पंकजा मुंडे यांनी त्यांची व्यथा बोलून दाखवली. ज्यांनी भाजप शून्यातून निर्माण केला, त्याचं आज अस्तित्त्व काय उरलंय? राजकीय कुटुंबातील व्यक्तींनी परिणामांचा विचार न करता निर्णय घेतला तरच त्यांचं अस्तित्त्व टिकून राहील, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed