• Sun. May 4th, 2025

शेतकऱ्यांची आर्थिक उन्नत्ती व दादासाहेबांचे स्वप्न साकार करण्याससाठी कारखाना सुरू करण्याचा उद्देश  -माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर

Byjantaadmin

Oct 27, 2022

शेतकऱ्यांची आर्थिक उन्नत्ती व दादासाहेबांचे स्वप्न साकार करण्याससाठी कारखाना सुरू करण्याचा उद्देश  -माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर

कारखाना कर्मचाऱ्यांना मोफत साखर वाटप
निलंगा (प्रतिनिधी) डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सह. साखर कारखानाचालू करण्याचा आमचा एकमेव उद्देश असा आहे की, दादा साहेबांनी या भागातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण संस्था व सहकारी साखर कारखाना काढले. त्यांचे स्वप्न होते की याभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, जनतेच्या हाताला छोटे मोठे उद्योगाच्या माध्यमातून काम मिळावे या त्यांच्या स्वप्न पूर्ती साठी आम्ही कारखाना चालू करीत आहोत , असे प्रतिपादन करून मा खासदार रूपाताई पाटील निलंगेकर म्हणाल्या अतिशय खडतर परिस्थितीत हा कारखाना चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यांनी चालविण्यासाठी घेतला आहे, कारखान्याचा कामगार हा कारखानाचा कणा असतो तेव्हा सर्व कामगारांनी त्यांना सहकार्य करावे असा सल्ला मा खा,रूपाताई पाटील निलंगेकर आक्का यांनी दिला.
दि 26 ऑक्टोबर रोजी डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर सह साखर कारखाना आंबूलगा ,ओंकार साखर कारखाना प्रा ,लि, युनिट येथे दिवाळी निमित्त कारखान्यातील सर्व कामगारांना माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते साखर वाटप करण्यात आली,त्यावेळी त्या बोलत होत्या
कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील ,जि, प,च्या माजी उपाध्यक्ष, भारतबाई सोळुंके ,चेअरमन दगडू सोळुंके ,भाजप जिल्हा उपाध्यक्ष, शेषेराव ममाळे, मा, नगरसेवक, वसुंधरा शिंगाडे ,सत्यवान धुमाळ उपस्थित होते
पुढे बोलताना माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर म्हणाल्या ,कारखान्यावर आल्यानंतर दादासाहेबांची आठवण येते कारण दादासाहेबांनी या कारखान्यात अतिशय काळजीपूर्वक लक्ष्य देऊन काम केले आहे. हा साखर कारखाना उभा करण्यात त्यांचा मोलाचा आणि शिंहाचा वाटा आहे,मागील काळात लातूर जिल्ह्यासह निलंगा तालुक्यातील मोठा दुष्काळ पडला होता या भागात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते, त्यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जिल्ह्याचे तात्कालीन पालकमंत्री मंत्री संभाजीराव यांनी माथ्यापासून पायथ्यापर्यंत पाणी आडवा पाणी मुरवा योजना,जलयुक्त शिवार अभियान अतिशय प्रभावीपणे राबविले , धनेगाव बंधारा बाधित शेतकऱ्यांना मावेजा मिळवून दिला व पाणी पूर्ण क्षमतेने अडवण्यात आले,बांध बंधीस्तीचे काम केले पडलेले पाणी शिवारात अडविले ओढ्या नाल्यावर सिमेंट बंधारे बांधले ,त्याच बरोबर इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान यशस्वी राबविले त्यामुळे जमिनीतील पाणी साठा वाढला गेल्या दोन वर्षात पाऊस चांगला झाला त्यामुळे या भागात उसाचे क्षेत्र वाढले असल्याचे सांगून पुढे बोलताना म्हणाल्या बाबुराव बोत्रे पाटील यांच्याकडे तीन करखाने आहेत पण संभाजी यांच्या आग्रहा खातर त्यांनी हा कारखाना चालविण्यासाठी घेतला आहे, त्यांना शेतकरी आणि कर्मचारी यांनी साथ द्यावी असे आवाहन शेवटी मा खा,रूपाताई पाटील निलंगेकर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना केले ,
कारखाना चालू करण्यासाठी जशी साथ दिली तशी भविष्यात द्या-चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

तुम्ही या करखाण्याचे केवळ कर्मचारी नाहीतर एक घटक आहेत तुम्ही हा बंद असलेला कारखाना रात्र पाठ काम करून कमी वेळात कारखाना चालू करण्याचा एक प्रकारे विक्रम केला आहे कारखाना चालू करताना जशी आपण साथ दिली तशीच साथ कारखाना चालविण्यासाठी द्या असे आवाहन कामगारांना चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी आपल्या भाषणात केले,
यावेळी कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे यांनी केले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *