• Tue. Apr 29th, 2025

देवळातल्या उघड्याबंब पुजाऱ्यांनीही सदरा घालावा; ड्रेसकोडवरून छगन भुजबळ बरसले

Byjantaadmin

May 29, 2023

मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याच्या निर्णयावर छगन भुजबळ यांनी सडकून टीका केली आहे.

Chhagan Bhujbal on Temple Dress Code : राज्यातील काही मंदिरात लागू करण्यात आलेल्या ड्रेसकोडवरून सध्या राज्यात वेगवेगळी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयावर सडकून टीका केली. ‘हा ड्रेसकोड म्हणजे मूर्खपणा आहे. तसं असेल तर मंदिरातील उघड्याबंब पुजाऱ्यांनीही सदरा घालावा, असं भुजबळ यांनी सुनावलं.भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. ‘मंदिरात वाट्टेल तसे कपडे घालू नयेत, नीटनीटके घालावेत असं सांगणं समजू शकतो. शाळेला सुट्टी आहे म्हणून आठ-नऊ वर्षांचा मुलगा देवळात गेला तर तो हाफ पँट घालूनच जाणार ना? त्यानं फुल पँटच घालावी असा आग्रह कसा केला जाऊ शकतो? ठराविक कपडेच सगळ्यांनी घालायचे असतील तर देवळात उघडेबंब बसलेले असतात, त्यांनीही काहीतरी सदरा वगैरे घातला पाहिजे. गळ्यात माळ असली की तो पुजारी आहे हे आपल्याला समजेल. ते पुजारीही अर्धनग्न नसतात का?,’ असा प्रश्न भुजबळ यांनी केला.पुजाऱ्यांनीही धोतर नेसावं, वर सदरा घालावा. तुळशी माळ घालावी. त्यातून तो पुजारी आहे हे कळेलच. पण तो उघडाच पाहिजे असं का,’ अशी विचारणाही त्यांनी केली.

संसदेतील धर्मकांडावरही टीका

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यातील धर्मकांडावरही छगन भुजबळ यांनी टीका केली. ‘नव्या संसद भवनाची गरज होती वगैरे सगळं ठीक आहे. मात्र, ज्या पद्धतीनं त्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा झाला, ते पाहून अतिशय वाईट वाटलं. स्वातंत्र्यानंतर झालेल्या संसदेच्या सोहळ्यात वेगवेगळ्या पक्षांचे, विचारांचे नेते एकत्र आले होते, मात्र काल धर्मकांड सुरू होतं. कुठूनतरी उघडेबंब लोक आणले होते, त्याच्या मध्ये एकटे पंतप्रधान दिसत होते. हे लोकतंत्र आहे की मनुतंत्र हेच कळत नाही, असा संताप भुजबळ यांनी व्यक्त केला. ‘तुम्हाला विरोधी पक्षाचे लोक नको होते तर किमान तुमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते किंवा तुमच्या मित्र पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन कार्यक्रम करायचा होता, असं भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed