रहेमानिया ज्युनिअर कॉलेज निलंगा चा 88.46% निकाल
निलंगा- येथील रहेमानिया ज्युनिअर कॉलेज, निलंगा येथील इ. १२ वी बोर्ड फेब्रु/मार्च 2023 परीक्षा निकाल नुकताच जाहीर झालेला असून विज्ञान शाखा 94.80 %, कला शाखा 70.37%, शाखानिहाय निकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विज्ञान, , कला शाखेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन करुन महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.
विज्ञान शाखेतून कुरेशी अलफिया जाफर या विद्यार्थीनीने 73.67 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच शेख नुजदिफा आयुब 70.83 टक्के गुण घेऊन द्वितीय व खादीम सफा अब्बास 68.67 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे रहेमानिया तालिमी सोसायटीचे अध्यक्ष मंजूर अहेमद देशमुख , संस्था सचिव फारुख अहेमद देशमुख, शाफिक अहेमद देशमुख,महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.