• Wed. Apr 30th, 2025

एसटी कर्मचाऱ्यांचा नवा जुगाड, महिला कंडक्टरने दोरीच्या साहाय्याने अॅक्सिलेटर कमी जास्त केला

Byjantaadmin

May 27, 2023

(ST Bus) खराब झाल्यानंतर बस चालकाने केलेला जुगाड सगळीकडे व्हायरल झाला आहे. एसटीच्या चालकाने महिला कंडक्टरच्या साहाय्याने आगारात कशी बस आणली या व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Transport Corporation) काही गाड्या अजून खराब स्थितीत आहेत, त्याचबरोबर राज्य शासनाकडून त्याचं गाड्या चालवल्या जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. बसचं अॅक्सिलेटर खराब झाल्यानंतर चालकाने महिला कंडक्टरच्या (sangli st news) हातात अॅक्सिलेटर बांधून दोरी दिली. महिला कंडक्टर ती दोरी कमी जास्त करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ही बस आगारापर्यंत दोघांनी कशीबशी नेली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उजेडात आला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा नवा जुगाड, महिला कंडक्टरने दोरीच्या साहाय्याने अॅक्सिलेटर कमी जास्त केला

एसटीचा अॅक्सिलेटर खराब झाला

बस चालकाने हाती स्टेअरिंग ठेवत अॅक्सिलेटरला दोरी बांधली, ती दोरी महिला कंडक्टरकडच्या हातात दिली. कवठेमहांकाळ ते घाटनांद्रे या मार्गवर हा बसमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. महामंडळाच्या नादुरुस्त एसटी बसेसचा मुद्या पुन्हा चव्हाट्यावर यामुळे आला आहे. सोशल मीडियावर या बसमधील अनेक व्हिडीओ फिरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed