शिंदे गट म्हणजे भाजपने पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा आहे. या कोंबड्या सध्या तडफड करत आहेत. या कोंबड्या कधीही कापल्या जातील. कोंबड्या कॉक कॉक आरवत असतात.
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या गटाला मी राजकीय पक्ष मानतच नाही. शिंदे गट म्हणजे भाजपने पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा असून या कोंबड्या कधीही कापल्या जातील अशी सडकून टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आज सकाळी राऊत पत्रकारांशी बोलत होते.
शिंदे गटाने भाजपकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकूण २२ जागांची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, ‘शिंदे गटाने राज्यात २२ काय संपूर्ण ४८ जागा जरी लढवल्या तरी काही फरक पडत नाही. शिंदे गट म्हणजे भाजपने पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा आहे. या कोंबड्या सध्या तडफड करत आहेत. या कोंबड्या कधीही कापल्या जातील.कोंबड्या कॉक कॉक आरवत असतात. तसं ते बोलतात. पक्ष म्हणून शिंदे गटाकडे काय विचारांची आहे, वैचारिक बैठक काय आहे? केवळ निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह विकत दिलं म्हणजे तो पक्ष ठरत नाही’ अशी टीका राऊत यांनी केली. शिवसेनेचे लोकसभेत एकूण १९ खासदार आहेत. १८ महाराष्ट्रात तर १ दादर नगर हवेलीचा खासदार शिवसेनेचा आहे. तेवढे खासदार संसदेत नक्कीच जाणार, अशी आशा राऊत यांनी व्यक्त केली.
द्रौपदी मुर्मूंना सोहळ्यापासून दूर का ठेवलं जातं आहे?
संसदेच्या नव्या इमारतीच्या उदघाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे नाव नाही. याविषयी कुणीही काही बोलत नाही असं राऊत म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या सोहळ्यापासून दूर का ठेवलं जात आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर येऊन देशाला सांगावं अशी मागणी यावेळी संजय राऊत यांनी केली.