• Wed. Apr 30th, 2025

लातूर जिल्हा परिषदेच्या सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये लंपी रोगाची औषधे उपलब्ध

Byjantaadmin

May 27, 2023

लातूर जिल्हा परिषदेच्या सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये लंपी रोगाची औषधे उपलब्ध

लातूर,  (जिमाका): जिल्ह्यामध्ये लंपी रोग चे रुग्ण तुरळक आढळून येत आहेत. लसीकरण केलेल्या पशुरुग्णांमध्येही लम्पीची लक्षणे दिसून येतात. परंतु ती सौम्य स्वरूपाची असून तीन दिवस उपचार केल्यानंतर पशु बरा होतो. परंतु लसीकरण न झालेल्या पशुधनांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसून येत आहेत जिल्हा परिषदे अंतर्गत असणाऱ्या सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये लंपी रोगाची औषधे उपलब्ध आहेत. रोग प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी विषाणू प्रतिबंधक फवारणी सुरू करण्यात आलेली आहे. पशुपालकांनी खाजगी पशुवैद्यकाकडे न जाता शासकीय पशुवैद्यकांकडूनच उपचार करून घ्यावेत.

सर्व औषधोपचार मोफत आपल्या दारात होतील. ज्या पशुधनाचे लसीकरण झालेले नाही त्या पशुधनास तात्काळ आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन लसीकरण करून घेण्यात यावे. लंपी रोगाचा प्रादुर्भाव गतवर्षी ऑगस्टमध्ये सुरू झाला. त्यानंतर सप्टेंबर 2022 अखेर पशुधन संख्येनुसार असणाऱ्या 2 लाख 57 हजार गोवंशीय पशुधनामध्ये एकूण 2 लाख 65  हजार 592 इतके लसीकरण पूर्ण झालेले आहे.

मार्च 2023 नंतर लातूर जिल्ह्यामध्ये परत एकदा लंपी रोगाचे पशुरुग्ण दिसून येत आहेत. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पाच ते सहा गावांमध्ये अधिक पशुरुग्ण दिसून आले. सप्टेंबर 2000 नंतर जन्मलेल्या वासरांमध्ये व नवीन आणलेल्या पशुधनांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *