• Sun. May 4th, 2025

लातूर जिल्हा बँकेच्या वतीने तीन ते पाच लाख रुपयापर्यंत शून्य टक्के दराने २५०५ शेतकरी सभासदांना ४६ कोटी रुपये पिक कर्ज वाटप – चेअरमन आमदार धीरज देशमुख यांची माहिती

Byjantaadmin

Oct 21, 2022

लातूर जिल्हा बँकेच्या वतीने तीन ते पाच लाख रुपयापर्यंत शून्य टक्के दराने २५०५ शेतकरी सभासदांना ४६ कोटी रुपये पिक कर्ज वाटप

निव्वळ ५ लाख रुपयाचे ३७२ शेतकऱ्यांना १८ कोटी वाटप

जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांची माहिती

लातूर :-राज्यात अग्रगण्य असणारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शुन्य टक्के दराने पिक कर्ज वाटप करण्याचे धोरण २०२१- २२ पासून स्वीकारले असून बँकेने आजतागायत ३ ते ५ लाखापर्यंत २५०५ शेतकरी सभासदांना ४५ कोटी ७७ लाख रुपये बिन व्याजि पिक कर्ज वाटप केलेले असून त्यात निव्वळ ५ लाख रुपयांपर्यंत ३७२ सभासदांना १८ कोटी ६० लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले असून ३ लाखापर्यंतचे १ लाख ५२ हजार ४९९ शेतकरी सभासदांना ७८४ कोटी २३ लाख नवीन पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे

जिल्हा बँकेने धोरण २०२१– २२ पासून स्वीकारले असून बँकेच्या धोरणानुसार पिक पेरा ऊपलब्ध क्षेत्रास अधीन राहून पात्र शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने शुन्य टक्के दराने पिक कर्ज वाटप केले आहे अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी बोलताना दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *