• Thu. May 1st, 2025

भीषण अपघात, पाचजणांसह १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू

Byjantaadmin

May 25, 2023

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या माळेगावजवळ एक भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण १९० मेंढ्यांसह चारजणांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय दोन जण गंभीर जखमी आहेत. मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मालमोटारीने उभ्या असलेल्या फरशीने भरलेल्या मालमोटरीला समोरून जबर धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.

हिंगोलीत दोन ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत पाच जण ठार तर दीडशे मेंढ्या दगावल्याची भीषण घटना आज (ता. २५) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर माळेगाव फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. मयतामधील एक जण राजस्थानमधील तर इतर चौघे मध्यप्रदेशातील असल्याचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चालकाला डुलकी लागली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान येथील एक ट्रक (एचआर- ५५-एजे-३१११ ) २०० मेंढ्यांना घेऊन हैदराबादकडे निघाला होता. या ट्रकमध्ये ट्रकचालकासह चौघेजण केबिन मध्ये बसले होते. तर, एक व्यक्ती पाठीमागे मेंढयांसोबत बसला होता. हा ट्रक माळेगाव फाट्याजवळ आला असताना उड्डाणपुलाखाली ट्रक चालकाला डूलकी लागली. अशात हा ट्रक समोर उभा असलेल्या ट्रकवर आदळला. या अपघातामध्ये ट्रकमधील तिघेजण जागीच ठार झाले. तर, दोन जण गंभीर जखमी झाले होते. नंतर रुग्णालयात नेत असतानाच त्यांचाही मृत्यू झाला. तसेच, दीडशे मेंढ्या दगावल्या.

उपचारासाठी नेताना 2 जखमींचा मृत्यू

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा शहारे, जमादार दिलीप पोले, संजय राठोड, इंगोले, गजानन होळकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील दोन्ही जखमींना उपचारासाठी कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

एका जखमीवर उपचार सुरू

अपघातामध्ये जागीच ठार झालेल्या तिघांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अपघातातील एका जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद मेने यांचे पथक त्याच्यावर उपचार करीत आहेत. या अपघातामधील मयतामध्ये सलमान आली मौला अली, सत्यनारायण बळाई, लालू मीना, कदीर मेवाती, आलम अली यांचा समावेश आहे. यामध्ये एक जण राजस्थानमधील असून इतर मध्य प्रदेशातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *