निलंगा:-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, निलंगा आणि कौशल्य ,रोजगार उद्योगजकता व नाविन्यता विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर ,माजी मंत्री कौशल्य विकास व कामगार, महाराष्ट्र राज्य यांनी “वेळेला अन्यय साधारण समजू नका वेळ परत येत नाही. वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवणे होय. आयुष्यातील गेलेली संधी पुन्हा परत येत नसते म्हणून वेळेला महत्व द्या दृढ निश्चयी व्हा आणि या शिबिरातुन प्रेरणा घेऊन आपल्या अंगीभूत कौशल्याचा विचार करून स्वतःचे करिअर निवडा आणि यशस्वी व्हा” असे मार्गदर्शन केले. त्यांच्या शुभहस्ते मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या शिबिराचे अध्यक्ष श्री बुड्डे एन.आर. नरेश इंजिनिअरिंग वर्क,छ. संभाजीनगर ( यशस्वी उद्योजक)
यांनी स्वतःचे उदाहरण देऊन एक ITI झालेला विद्यार्थी कसा यशस्वी उद्योजक होऊन इतरांना रोजगार देऊ शकतो याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्राध्यापक डॉ.गजेंद्र तरंगे यांनी 10 वी 12 वी नंतर CET ,NEET,MPSC ,UPSC, तयारी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले तर श्री धनंजय गायकवाड ,मैत्री फाउंडेशन ,लातूर यांनी व्यक्तिमत्व विकास कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. व श्री बजाज डी. आर. गटनिदेशक यांनी ITI ची प्रवेश प्रक्रिया व रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. निलंगा तालुक्यातील 1000 विद्यार्थी व पालकांनी करिअर शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री वाघमारे एस. बी. जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी, लातूर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. रणभिडकर आय.टी. प्राचार्य, ITI निलंगा यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पनीदेशक श्री पाटील एस. एम. यांनी केले सदरील शिबिर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे गटनिदेशक श्री जाधव ए.एस. ,शिल्पनिदेशक श्री पांचाळ के.एम. सर्व कर्मचारी वर्ग यांनी युवा शक्ती करिअर शिबीर यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
आयुष्यातील गेलेली संधी पुन्हा परत येत नसते म्हणून वेळेला महत्व द्या-आमदार संभाजी पाटील निलंगेकर
