स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे कडून प्रा.शेख समिना यांना डाॅक्टरेट पदवी प्रदान
लातूर :- येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ लातूर संचलित जयक्रांती कला व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. शेख समिना बु-हाणोद्दीन यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांचे कडून डाॅक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
माजी प्राचार्य पी.एन.सगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य सरकारच्या २०१४-१५ ते २०१९-२० अर्थसंकल्पाचा तुलनात्मक अभ्यास आणि विश्लेषण या विषयावर त्यांनी पीएच डी पुर्ण केली आहे.
याबद्दल संस्थेचे सचिव प्रा. गोविंदराव घार,अध्यक्ष बालाजी घार,माजी प्राचार्य पी.एन.सगर,प्राचार्य श्रीधर कोल्हे,माजी प्राचार्य डॉ.कुसूम पवार (मोरे),प्राचार्य प्रशांत घार, डाॅ.संगीता घार,प्रा.डाॅ.गुंजरगे दिलीप,डाॅ.राजेश्वर खाकरे,डाॅ.रामेश्वर स्वामी आदींनी डाॅ.समिना शेख यांचे अभिनंदन केले आहे.