आरोग्य चिकित्सा ,नेत्र तपासणी, चष्मा व औषधे वाटप शिबीर उत्साहात संपन्न
शिरुर अनंतपाळ (तालुका प्रतिनिधी):-शहरातील कुमारस्वामी नगरीत लोककल्याण आरोग्य केंद्र, मुंबई व नगरसेवक सुधीर लखनगावे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य चिकित्सा शिबीर नेत्र तपासणी,चष्मा व औषधे वाटप करण्यात आली.
निलंगा पंचायत समिती माजी सभापती अजित माने यांच्या हस्ते ग्रावदैवत अनंतपाळाच्या प्रतिमेचे पुजन करुन शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. आरोग्य चिकित्सा शिबीरात डाँं. रविंद्र चव्हाण, डाँं.शिवम भोसले,डाँं.मयुर मोरे, डाँं.भगवंत पाटील यांच्या टिमने 228 रुग्णांची मोफत ताप,सर्दी,डोके,अंगदु:खी,पित्त,रक्तदाब, यांच्यासह नेत्र तपासणी करुन गरजुंना चष्मा व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँंग्रेस नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष पंडीतराव धुमाळ,नगरसेवक सुधीर लखनगावे,सुरेंद्र धुमाळ, दयानंद चोपणे,सरोजाताई गायकवाड,शिवसेना तालुकाप्रमुख भागवतराव वंगे,राष्ट्रवादी काँंग्रेस पार्टी तालुकाअध्यक्ष विठ्ठलराव पाटील,अब्दुल अजीज मुल्ला,बाळासाहेब पाटील शेंदकर,काँंग्रेस शहराअध्यक्ष अशोक कोरे,सभापती संतोष शिवणे, ऋषीकेश आवाळे,माधव खरटमोल,महादेव संभाळे,केशव मादलापुरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नेते,कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने ऊपस्थीत होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरसेवक. सुधीर लखनगावे यांच्या मित्रमंडळाच्या सदस्यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक. सुधीर लखनगावे व सुत्रसंचालन भागवतराव वंगे व आभार गोविंद श्रीमंगल यांनी मानले.