(2000 Rs Note) नोटांचं प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायलयात (Delhi High Court) पोहोचलं आहे. भाजपचे नेते अश्विन उपाध्याय यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये दोन हजारांच्या नोटा ओळखपत्राशिवाय बदलण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या नोटा बँकेमध्ये बदलून देणे हे तर्कहीन आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 चं उल्लंघन असल्याचं देखील म्हटलं आहे.
तसेच, यामध्ये (RBI) आणि (SBI) संबंधित खात्यातच पैसे जमा करण्याचे निर्देश देण्याची देखील मागणी केली आहे. कारण इतर कोणत्याही बँकेत जाऊन पैसे जमा करु शकणार नाही आणि यामुळे काळापैसा ठेवणाऱ्या लोकांपर्यंत सहज पोहोचता येईल. तसेच भ्रष्टाचार आणि अवैध मालमत्ता, उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असणाऱ्या लोकांविरधोत योग्य कारवाई करण्यात यावी, असे निर्देश देण्याची मागणी देखील या याचिकेमध्ये करण्यात आली आहे.
*2000 च्या नोटा बदलण्यासाठी काय करावे?*
*https://jantaexpress.co.in/?p=8194*