• Sat. May 3rd, 2025

ऊस उत्पादक शेतकरी मांजरा परिवाराच्या वतीने     संपादक संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन 

Byjantaadmin

May 21, 2023
दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून
——————————————————————————–

ऊस उत्पादक शेतकरी मांजरा परिवाराच्या वतीने

 संपादक संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
लातूर : दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून ऊस उत्पादक शेतकरी मांजरा परिवाराच्या वतीने शुक्रवार, दि. २६ मे २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता लातुरात  दैनिक लोकमत पुणे चे संपादक संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
                            लातूर शहरातील मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी  माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख हे राहणार आहेत. यावेळी संजय आवटे हे  ‘ लोकचळवळीतील समर्पित लोकनेता : विलासराव देशमुख ‘ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. विलासराव देशमुख यांचे नेतृत्व लोकचळवळीतून घडले होते. तसेच त्यांना सर्वसामान्यांच्या समस्यांची चांगली जाण  होती. आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीचा चेहरा पाहून हे महान नेतृत्व संबंधिताची अडचण जाणून घेऊन ती तात्काळ दूर करण्याचा प्रयत्न करत असत. याच कारणामुळे हे नेतृत्व आपल्यातून जाऊन एवढा प्रदीर्घ काळ उलटूनही ते आजही आपल्यातच असल्यासारखे वाटतात. आपल्याकडे आलेली व्यक्ती कोणत्या पक्षाची, विचारधारेची आहे हे न पाहता विलासराव देशमुख यांनी आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात कार्य केले आहे, ही बाब कोणीही नाकारू शकत नाही. साखर उद्योगात ऊस उत्पादकांना चालू गळीत हंगामात विक्रमी भाव देऊन राज्यातील पहिल्या पाच कारखान्यात  मांजरा परिवार अग्रणी राहिलेला आहे.  शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्याचे स्वप्न विलासराव देशमुख यांनी पाहिले होते.  ते आजमितीस सत्यात उतरले आहे. त्या अनुषंगाने मांजरा परिवाराचे कुशल मार्गदर्शक, ग्रामीण अर्थक्रांतीचे जनक दिलीपराव देशमुख यांचा गौरवही यावेळी करण्यात येणार आहे.
अशा या महान नेत्याच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाच्या या कार्यक्रमास सर्वांनी  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन राजेंद्र मोरे, सत्तार  पटेल, अरुणदादा  कुलकर्णी, राजीव कसबे, अशोक दहीफळे , नवनाथ शिंदे, नारायण नरखेडकर , भरत  पाटील, दगडू बरडे, प्रताप पाटील, माधव कवठाळे , प्रा. पी. सी. पाटील, डॉ. प्रभाकर भोसले  आदिंनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *