अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना लागले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार च्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग सुखकर झाला असल्याने हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर आलेली असून, संभाव्य तारीख आणि मंत्रांची नावेही समोर आली आहे.
कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे शिंदे-फडणवीस सरकारकडून सांगण्यात आलं होतं. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा कार्यकारी बैठकीच्या निमित्ताने राज्यात आले होते. यावेळी त्यांच्याशी विस्ताराबाबत चर्चा झाली. येत्या 23 किंवा 24 मे रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संभाव्य मंत्र्यांची नावं
शिंदे गटाची मंत्री विस्ताराची यादी तयार झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या यादीत आमदार बच्चू कडू, प्रताप सरनाईक, सदा सरवणकर, चिमणराव पाटील, भरत गोगावले, यामिनी जाधव, संजय शिरसाट यांच्यासह आणखी काही भाजप आमदार यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.