• Mon. May 5th, 2025

महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये?

Byjantaadmin

May 17, 2023

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पहिल्या लढाईत भाजप-शिवसेनेचा भगवा झेंडा पुणे महापालिकेवर फडकेल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास महापालिका निवडणूक होण्याचे संकेतही दिले.भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीस बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, दिलीप कांबळे, राजेश पांडे आदी या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात जगदीश मुळीक शहराध्यक्षपदाचा संघर्षपर्व या कार्यअहवाल प्रकाशित करण्यात आला.

महावसुली सरकार, स्थगिती सरकार घालवून आता राज्यात गतिशील सरकार आहे. कोट्यवधीच्या योजना पुन्हा पुण्यात सुरू झाल्या आहेत. मिळकत कराचा ४० टक्क्यांचा प्रश्न सोडवला. PUNE भाजपचा गड आहे. गिरीश बापट, मुक्ता टिळक यांची पोकळी जाणवेल. पण गिरीश बापट यांनी संघर्ष करून कार्यकर्त्यांची फळी उभी केली. आजचा संघर्ष वेगळा आहे. संघटन ही भाजपची ताकद आहे. कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आता पहिली लढाई महापालिकेची येईल. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये किंवा न्यायालय सांगेल तेव्हा येईल. पहिली लढाई भाजप-शिवसेना जिंकणार, पुणे महापालिकेवर भगवा फडकणार, असे त्यांनी सांगितले.

कर्नाटकात भाजपचे ०.४ टक्के इतकेच कमी मतदान झाले आणि चाळीस जागा कमी झाल्या. पण लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील २८ पैकी किमान २५ जागा भाजप जिंकेल, हा माझा दावा आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. जगातील अनेक देशांत मंदी असली तरी भारतात मंदी नाही. जगात सर्वाधिक वेगाने भारताची अर्थव्यवस्था विकसित होत असल्याचे फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *