• Mon. May 5th, 2025

बोलेरो आणि ट्रॅक्टरची समोरसमोर धडक, 7 जणांचा जागीच मृत्यू

Byjantaadmin

May 17, 2023

सांगली, 17 मे : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव बोलेरो गाडी आणि रॉंग साईडने येणाऱ्या विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण जखमी झाले आहे.

(रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात)

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी-नागपूर महामार्गावर आज सकाळी मिरज जवळील वड्डी गावाजवळील हायवेवर हा भीषण अपघात झाला.सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी येथे भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झाले आहेत. रत्नागिरी – नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरा-समोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला आहे. मृतांमध्ये 3 महिला, 3 पुरुष आणि 12 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

बोलेरो गाडीमधील सर्वजण कोल्हापूरहुन पंढरपूरच्या दिशेने चालले होते. पण त्याचवेळी रॉंग साईडहुन विटाने भरलेला ट्रॅक्टरला आला. त्यामुळे भरधाव वेगात असलेली बोलेरो गाडी ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात बोलेरोचा चक्काचूर झाला. बोलेरो गाडी ट्रॅक्टरमध्ये अडकून पडली होती. घटनास्थळी जेव्हा मदत पोहोचली तेव्हा मृतदेह अक्षरश: पत्रा कापून बाहेर काढावे लागले होते.बोलेरो गाडीतील मयत हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. हे सर्व जण एकाच गाडीतून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते. मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी-नागपूर माहमार्गावरील वडडी गावाच्या हद्दीत बोलरे गाडी पोहचली असता, राँग साईडने विटाने भरलेला ट्रॅक्टर अचानक समोर आला. ज्यामध्ये भरधाव असणारी बोलेरो गाडी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली.ज्यामध्ये गाडीचा चक्काचुर होऊन 7 जण जागीच ठार झाले आहेत. तर 1 तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी मिरज पोलीस दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *